तैनवाला फाउंडेशन मार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलींना मिळणार बिनव्याजी अर्थसहाय्य

Jun 8, 2022

नाशिक जिल्ह्यातील २५ मुलींचे पालकत्व या योजने अंतर्गत स्वीकारले जाऊन या मुलींना शैक्षणिक खर्चासाठी विशेष बिनव्याजी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे

नाशिक : तैनवाला फाउंडेशनचे रमेश तैनवाला व त्यांच्या पत्नी सौ. शोभा तैनवाला यांच्या संकल्पनेतून तैनवाला फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलींना बिनव्याजी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तैनवाला फाउंडेशनने शैक्षणिक कर्जाला पर्याय म्हणून मागील आठ वर्षात या उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत १२५ पेक्षा अधिक मुलींना उच्च शिक्षण मिळवून देत, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे केले आहे. या वर्षी देखील या अभिनव योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थिनींनी संपर्क साधण्याचे आवाहन तैनवाला फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

शिक्षण हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. त्यामुळे मुलांच्या करिअर इतकेच महत्त्व मुलींच्या करिअरला देखील प्राप्त झाले आहे. या स्पर्धेच्या युगात सुजाण आणि आर्थिकरित्या सक्षम असणाऱ्या पालकांच्या मुली करिअर निवडीसाठी आग्रही व जागरूक असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्या मुलींना शिक्षणासाठी पोषक वातावरण व आर्थिक पाठबळ मिळते. परंतु गुणवत्ता, उच्च शिक्षणाची व करिअर करण्याची तीव्र इच्छा असून देखील केवळ आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अशा मुलींसमोर पर्याय उरतो तो शैक्षणिक कर्ज घेण्याचा. परंतु ह्यातही अवाजवी व्याजदरामुळे त्यांना आपल्या करिअरकडे पाठ फिरवावी लागते. १२ वी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, नर्सिंग, बी. टेक, आर्किटेक्चर, सी.ए, बी फार्मसी, बीएड यांसारख्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील २५ मुलींचे पालकत्व या योजने अंतर्गत स्वीकारले जाऊन या मुलींना शैक्षणिक खर्चासाठी विशेष बिनव्याजी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे

तैनवाला फाउंडेशनच्या या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणासाठी अर्थसहाय्य म्हणून घेतलेल्या रक्कमेची परतफेड मुलींनी शिक्षण पूर्ण करून रोजगार मिळवल्यावर करावयाची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनीस बारावी परीक्षेत किमान ७५ % पेक्षा अधिक गुण असणे अनिवार्य असून, विद्यार्थिनी नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. तर विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ३ लाखांपेखा अधिक नसावे. सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या गरजू विद्यार्थिनींची निवड या योजनेसाठी करण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ जून २०२२ असून या उपक्रमाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी ९८८१०९६३१६ किंवा ८६००००३४६० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन तैनवाला फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News