जि.प. गट व पं.स.गणांच्या प्रारूप प्रभागरचना; हरकती व सूचनांवर आता 13 जूनला होणार सुनावणी

Jun 10, 2022

नाशिक:जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती  प्रारूप प्रभाग रचनेवर घेतलेल्या हरकतींची सुनावणी  प्रशासकीय कारणास्तव 10 जून ऐवजी 13 जून 2022 रोजी माननीय विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिकरोड यांच्या कार्यालयात सकाळी 11.00 वाजता होणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी  शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी गटाची व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाची अधिसूसना 2 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार 2 जून 2022 ते 08 जून 2022 या कालावधी त सदर प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सुचना मागविण्यात आलेल्या होत्या.

सदर हरकती व सूचनांवर होणारी सुनवाणी प्रशासकीय कारणास्तव 10 जून ऐवजी 13 जून 2022 ला होणार असल्याने सुनावणीबाबत झालेल्या या बदलाची हरकतधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी  शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News