अखेर दुबईच्या मराठी दांपत्याला मिळाले संतान सुख

Jun 11, 2022

नाशिकच्या प्रोजेनेसिस क्लिनकची नवतंत्रज्ञानाची IVE प्रणाली ठरली यशस्वी

नाशिक : दुबईला राहणार्‍या मराठी दाम्पत्याने मूल होण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय हॉस्पिटलमध्ये उपचार केले मात्र त्यांचे आपत्य प्राप्तीचे स्वप्न अखेर नाशिक येथील प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेन्टरमधील उपचाराने पूर्ण झाल्याची माहिती प्रोजेनेसिसच्या डॉ.नरहरी मळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिले. याविषयी अधिक माहिती देत म्हणाले की , “राजाराम आणि प्रियंका खांडळ हे कामानिमित्त दुबईत असतात. त्यांचा विवाह होऊन १५ वर्ष झाली तरी मुलं होत नव्हते. लग्नानंतर काही वर्ष वाट पाहून मूल न झाल्याने या जोडप्याने फर्टीलिटी ट्रीटमेंट घेण्याचा निर्णय घेतला. प्रथम दुबईत असल्याने यु.ए.ई मधील हॉस्पिटलमध्ये तिथल्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांनी IVE करण्याचा निर्णय घेतला.पहिलीच IVE सायकल अपयशी ठरली.
त्यानंतर त्यांना तेथील डॉक्टरांने पुन्हा IVE चा सल्ला दिला. या दरम्यान या जोडप्याचे भारतात यायचं ठरलं आणि ते नाशिक मध्ये आले. नाशिक मधील एका प्रसिद्ध फर्टीलिटी तज्ज्ञ डॉक्टरांकडे त्यांनी पुन्हा एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल ३ वेळा IVE सायकल्स् आणि ७ वेळा iui (इंट्रा युट्रेराइन इनसेमीनेशन म्हणजे कॅथेटरद्वारे शुक्रपेशी गर्भाशयात सोडणे) अशा देखील सायकल्स् केल्या. पण तरीही हे उपचार फळाला आले नाही. नंतर निराश होऊन त्यांनी काही वर्षे उपचार थांबवले कारण मोठे प्रयत्न करून देखील यश न मिळाल्याने हे दाम्पत्य खचून गेले. दरम्यान काही जणांच्या सांगण्यावरून पुन्हा या जोडप्याने व्यंधत्वावरील आयुर्वेदिक उपचार पद्धती देखील आजमावून पहिली. त्याचाही उपयोग झाला नाही.
अखेर प्रियंका खांडळ यांच्या आईने, लेक आणि जावई यांना आमच्या नाशिकच्या प्रोजेनेसिस र्फेटीलिटी सेंटर मधील डॉक्टर आणि उपचार पध्दतीबद्दल सांगितले. आणि पहिल्याच IVE सायकल मध्ये त्यांना संतान सुख प्राप्त होणार असल्याची गोड बातमी मिळाली. ”
प्रियंका खांडळ आणि तिच्या पती राजांना आनंदाला पारावर उरला नाही; इतका की उभयतांना आकाश ठेंगणे वाटले. प्रोजेनिसिस सेंटर मधील डॉक्टर व सर्व स्टाफचे त्यांनी आभार मानले.

दांपत्यांमध्ये वाढत चालेले वंधत्व व IVE च्या प्रमाणाचे कारण स्पष्ट करत डॉ.मळगावकर पुढे म्हणाले की , तरुण व तरुणीमध्ये व्यायामाचा आभाव, योग्य वयात लग्न न होणे, करिअर व स्टेल लाईफच्या गडबडीत गर्भधारणा योग्य वयात न होणे, पुरुषांबरोबर महिलांचे वाढते धुम्रपान इत्यादी कारणे प्रमुख महत्वाची आहे.

प्रोजेनेसिस मध्ये नवदांपत्य जास्तीत जास्त एग फ्रिजिंग तंत्रज्ञानचा वापर करुन संतान सुखाचा लाभ घेता येऊ शकतो.याबाबत देखील त्यांनी आपले विचार स्पष्ट केले.

काय आहे एग फ्रिजिंग तंत्रज्ञान?
आई होण्याचं योग्य वय आहे 20 ते 30 मध्ये पण जर एखादी स्त्री 20 ते 30 या वयात आई बनू इच्छीत नाही आणि जर आपल्या करियरमुळे किंवा अन्य कारणामुळे तिला 30 वयानंतर आई बनायचे असेल तर अशावेळी एग फ्रीजिंग (Egg Freezing) पद्धतीचा वापर करून ती आई होण्याचे आपले स्वप्न साकार करू शकते.एग्ज फ्रिजिंंग प्रक्रीयेमध्ये स्त्रींच्या अंडाशयातील अंडी काढून त्यांना प्रयोगशाळेत योग्य तापमानामध्ये सुरक्षितपणे स्टोर केले जाते. वैद्यकीय भाषेत एग्ज फ्रिजिंगला क्राइयोप्रिजर्वेशन असे म्हणतात. एग्ज फ्रिजिंग नंतर स्त्री तिला हव्या त्या वयात आई बनू शकते. तिची अंडी हि प्रयोगशाळेत सुरक्षित आणि निरोगी असल्या कारणाने त्या सहाय्याने ती सहजपणे गरोदर राहू शकते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News