महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या २०२२ पंचवार्षिक निवडणुकीत एमएससीडीए पॅनलचा प्रचंड मताधिक्याने विजय

Jun 27, 2022

Nashik : महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या पंचवार्षिक २०२२ निवडणुकीसाठी सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष – मा. श्री. जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या “एमएससीडीए पॅनलमधील” सहाही उमेदवारांनी  प्रचंड मताधिक्य मिळवून गेल्या तीन निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीमध्येही घवघवीत यश मिळवून विजयाची पताका अधिक उंचीवर नेली आहे. 

फार्मासिस्ट फर्स्ट: सर्वांसाठी सर्वांसोबत हे ब्रीद वाक्य घेऊन मतदानाचा अधिकार असलेल्या २,८०,५०३ नोंदणीकृत फार्मासिस्टपुढे एमएससीडीए पॅनलचे – एकच उद्दिष्ट : फार्मासिस्टचे उज्वल भविष्य ही टॅग लाईन देऊन पॅनलचा जाहीरनामा मतदारांपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न मा. जगन्नाथ शिंदे यांच्या राज्यभरातील खंबीर समर्थकांनी राज्यातील तळागाळापर्यंत पोहचविण्यात यश मिळविले. सदर निवडणुकीमध्ये एकूण ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदानाचा अधिकार असलेल्या नोंदणीकृत फार्मासिस्टपैकी शेवटची तारीख दि. १७ जून २०२२ पर्यंत एकूण १,०९,५७५ मतदारांचे बॅलेट पेपर परिषदेकडे पोच झाले  होते. शनिवार दि. २५ जून २०२२ रोजी मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरु होऊन ती रात्री संपली. निवडणूक निर्णय अधिकारी मा. श्री. मिलिंद पाटील (सहाय्यक आयुक्त-अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य) यांनी निकाल जाहीर केला. यात श्री. विजय पांडुरंग पाटील, सांगली यांना 90,004, सौ. सोनाली देविदास पडोळे, नागपूर यांना 89, 505, श्री. मनोहर सोपान कोरे, औरंगाबाद यांना 89,335, श्री. अतुल अशोकराव अहिरे, नाशिक यांना 88,498, श्री. गणेश चंद्रकांत बंगळे, बुलढाणा यांना 88,439 आणि श्री. नितीन नवनीतराव मणियार, मुंबई यांना 87,719 मते मिळाली. सातव्या क्रमांकाच्या उमेदवारास 6,004 इतक्या मतांवरच समाधान मानावे लागले. 

राज्यभरातील फार्मासिस्ट बंधू भगिनींचे या निवडणुकीकडे लक्ष लागून होते. येणाऱ्या कार्यकालात एमएससीडीए पॅनलने जाहीरनाम्याद्वारे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता तंतोतंत केली जाईल असे आश्वासन निकालानंतर महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री जगन्नाथ शिंदे यांनी दिले व सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले. तसेच एमएससीडीए चे सचिव श्री. अनिल नावंदर व इतर पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, सचिव आणि त्यांची तळागाळापर्यंत जोडली गेलेली टीम यांच्या विशेष परिश्रमामुळे हे यश प्राप्त होऊ शकले अशी भावना श्री. शिंदे यांनी व्यक्त केली. 

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News