नाशिक – जागतिक डॉक्टर दिनानिमित्त नवी दिल्लीच्या भिकाजी कामा प्लेस येथील हॉटेल हयात रेजेन्सीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या डॉक्टर्स डे कॉनक्लेव्हमध्ये नाशिकमधील प्रसिद्ध किडनीरोगतज्ज्ञ डॉ. देवदत्त चाफेकर यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते डॉ. चाफेकर यांना सन्मानित करण्यात आले.
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या डॉक्टर्स डे कॉन्क्लेव्हमध्ये डॉ. चाफेकर यांना ‘लिजंड ऑफ इंडिया’साठी नामांकन मिळाले. या कॉनक्लेव्हमध्ये दोनशेहून अधिक पाहुणे उपस्थित होते. त्यामध्ये देशातील आरोग्यसेवेशी संबंधित आघाडीच्या वैद्यकीय अधिकऱ्यांचा समावेश आहे. डॉक्टर्स डे म्हणजे बंधुत्वाचा आदर म्हणून नामांकित केलेला दिवस. डॉक्टर्स डे कॉन्क्लेव्हच्या मागील कार्यक्रमांमध्ये ३०० हून अधिक डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला होता. यामध्ये बी. सी. रॉय आणि पद्म पुरस्कार विजेत्यांचा समावेश होता.
कॉन्क्लेव्हमध्ये “द इकॉनॉमिक टाइम्स – इन्स्पायरिंग डॉक्टर्स ऑफ इंडिया 2022” या कॉफी टेबल बुकचे प्रकाश करण्यात आले. या पुस्तकामध्ये भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या वैद्यकशास्त्र क्षेत्रातील नामांकित डॉक्टरांच्या माहिताचा समावेश आहे. या पुस्तकरूपी संकलनामुळे डॉक्टरांचे वैयक्तिक प्रचंड प्रयत्न आणि त्यांचे यश अधोरेखित करते आणि त्यांना एका छत्राखाली एकत्र आणते.





