लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनंतर जोडप्याला मिळाले आई-बाबा होण्याचं सुख; प्रोजेनेसीस हॉस्पिटलमुळे नाशिकचे नाव विश्वात अधोरेखित!

Jul 15, 2022

नाशिक : विवाहानंतर मुल न होणाऱ्या कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत असलेल्या येथील प्रोजेनेसीस फर्टिलिटी सेन्टरमधील उपचाराने एका कुटूंबातील जोडप्याला लग्नानंतर तब्बल 12 वर्षांनंतर आई-बाबा होण्याचं सुख मिळणार असल्याने हे जोडपे सुखावले आहे.सविस्तर माहिती अशी की, राहुल कुलकर्णी आणि भावना कुलकर्णी यांच्या विवाहला १२ वर्ष झाली. लग्नानंतर काही वर्षे वाट पाहून मुल होत नसल्याने या जोडप्याने वंध्यत्वावरील उपचारासाठी अनेक मोठ्या शहरात उपचार  घेतले मात्र आई-बाबा होण्याच स्वप्नं पूर्ण होत नव्हते. अनेक ठिकाणच्या उपचारानंतरही यश येत नसल्याने हे जोडपे निराश होत होते. काही दिवसानंतर त्यांना डॉ. नरहरी मळगांवकर यांच्या प्रोजेनेसीस हॉस्पिटलमधील उपचाराबद्दल आणि येथील ‘सस्कसेस रेट’ बद्दल माहिती समजली. हे जोडपे लगेच कोविड काळ असूनही एप्रिलमध्ये  उपचारांसाठी ‘प्रोजेनेसीस’  मध्ये आले.डॉ नरहरी मळगांवकर व  डॉ सोनाली मळगांवकरांनी पहिल्याच भेटीत त्यांच्या समस्याचे निदान करून  वर्षभरात बाळ होईल असा दिलासा दिला.डॉक्टरांसोबत पहिल्याच भेटीत हताश झालेल्या या जोडप्याला डॉक्टरांच्या विश्वासामुळे मनोधैर्य मिळाले.
दरम्यान, येथील उपचार आणि डॉ मळगांवकर यांच्या अनुभवी आणि शास्त्रोक्त उपचार पद्धती, समुपदेशन आणि  सांगण्यावरून प्रत्येक गोष्ट जोडप्याने कटाक्षाने पाळून त्याना प्रतिसाद दिला.  ‘प्रोजेनेसिस’ मधील उपचार, अनुभवी मार्गदर्शनाने कुलकर्णी दाम्पत्याना उपचार सुरू होण्याच्या पाचव्या महिन्यातच ‘गुड न्यूज’ मिळाली. आपल्या घरी बाळ पाऊलांनी सुख रांगत येणार ही गोष्ट समजताच जोडप्याच्या आनंदाला पारावर उरला नाही.

‘प्रोजेनेसिस’ मध्ये पहिल्याच  IVF सायकलमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला.“हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये विलक्षण ‘पॉझिटीव्हिटी’ आहे. इथला स्टाफ खूप चांगला, अनुभवी आणि कोऑपरेटिव्ह आहे”, असे मत श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. प्रोजेनेसीस हॉस्पिटलमध्ये वंध्यत्वावरील उपचारासाठी  अंतराष्ट्रीय दर्जाच्या सेवा सुविधा दिल्या जातात. येथे थेट ट्रीटमेंट प्रदान न करता केसचा तपशीलवार अभ्यासला  जातो.  मूळ कारणाचे विश्लेषण करून त्यानंतरच  सूचित उपचार योजना समजावून सांगितली जाते.

येथील हॉस्पिटलमध्ये   ‘आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलाझेनशन) तंत्रज्ञान वापरुन मूल न होणार्‍या जोडप्यांवर यशस्वी उपचार केले जातात. त्याचा सक्सेस रेट अतिशय उत्तम असा आहे.  ‘प्रोजेनेसीस ’मध्ये आयव्हीएफ, इक्सी, इम्सी या तिन्ही तंत्रज्ञानाचा सक्सेस रेट मोठा असून तो वाढत असल्याचे सर्वेक्षणातून सिद्ध होत आहे.

उत्कृष्ट तंत्रज्ञान, सेवा, आणि सक्सेस रेट मल्टीपल आययूआय(इंट्रा यूटेराईन इनसेमिनेशन) उपचार करुन यश न आलेले रुग्ण मल्टीपल आयव्हीएफ करुन अपयशी ठरलेली जोडपी आणि पुरुष व्यंध्यत्वातील अनेक समस्येवर ‘प्रोजेनेसिस’ मध्ये यशस्वी उपचार करण्याचे तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ, अनुभवी डॉक्टरांची टीम डॉ. मळगांवकर यांच्या मार्गदर्शनात सेवा देत आहे. या हॉस्पिटलची निवड पेशंट करतात कारण येथे वैयक्तिक लक्ष देऊन सेवा दिली जाते.  याशिवाय येथील उपचाराची फिस परवडण्यासारखी असून इथिकल प्रॅक्टिसने वैद्यकीय नितीमत्ता पाळून उपचार केले जातात. येथील लॅब्रोटरी जागतिक दर्जा आणि मान्यताप्राप्त आहे. रिप्रोडक्टीव्ह तंत्रज्ञानाचा वापर करुन रुग्णांवर उपचार केले जातात आणि उपचारांचा सक्सेस रेटही सर्वाधिक आहेत. या सर्व कारणांनी रुग्ण प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्येच उपचार घेतात.

उच्च नितीमत्ता पाळून ‘प्रोजेेनिसीस फर्टिलिटी सेंटर वैद्यकीय उपचार देऊन अनेक जोडप्यांच्या जीवनात अपत्यप्राप्तीचा आनंद देत आशेचा किरण फुलवत आहेत. ‘प्रोजेनेसिस’ च्या या यशस्वी वाटचालीचा जगातील विविध देशांनी गौरवही केला आहे. आतापर्यंत प्रोजेनेसिसला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बिझनेस एक्सलन्स ऍण्ड रिसर्च ग्रुप (बीईआरजी) या सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी व योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी आयकॉन्स ऑफ हेल्थकेअर या वर्गवारी अंतर्गत प्रोजेनिसीस फर्टिलिटी सेंटरला सन्मानित करण्यात आले आहे. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर वैद्यकीय क्षेत्रात देत असलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्यामध्ये टाईम्स ऑफ इंडीयाचा सर्वोत्कृष्ट आयव्हीएफ सेंटर फॉर इमर्जिंग आयव्हीएफ सेंटरचा पुरस्कार, भारतातील फास्टेस्ट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफचा पुरस्कार या आणि अशा पुरस्कारांचा समावेश आहे.

येथील आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज लॅब, आधुनिक उपकरण, आणि तज्ज्ञ  डॉक्टर्सचा अनुभव आणि विश्वास यासह यशाची शक्यता  यामुळे हॉस्पिटलचे नाव भारतासह विदेशातही प्रसिद्ध होत आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News