लहान मुलांमधील अपंगत्व निर्मूलनासाठी वेळेत निदान होणे आवश्‍यक – डॉ.निखिल चल्लावार

Aug 10, 2022

Bone and Joint Day सप्ताहाचे आयोजन

नाशिक: दरवर्षी ४ ते ११ ऑगस्ट “बोन ऍण्ड जॉइंट डे (Bone and Joint Day)” सप्ताह साजरा केला जातो. हा सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश हा असतो की, हड्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. हा सप्ताह इंडियन ऑर्थोर्पेडिक असोसिएशनद्वारे २०१२ सालापासून सुरू करण्यात आला. निरोगी आयुष्यासोबत हाडांची मजबुती आणि निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार महत्वाचा आहे. हा मुख्य उद्देश समोर ठेऊन जनजागृती अभियान व विविध उपक्रम राबून हा दिवस भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
डॉ निखिल चल्लावार हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव लहान मुलाचे ‘अस्थीरोग शस्त्रक्रिया तज्ञ्’ आहेत, आणि गेली आठ वर्षांपासून डॉ चल्लावार हे नाशिक मध्ये अपंग मुलांची देखभाल व त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करत आहेत. त्यांना या सामाजिक कार्यासाठी अत्यधुनिक उपकरणे व साधने प्राप्त व्हावीत यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ने हि, सामाजिक जवाबदारी स्वीकारली, जे उपचार यापूर्वी फक्त मोठ्या महानगरामध्ये आणि परदेशात उपलब्ध होती, याची उणीव नाशिक शहरात कायम जाणवत होती म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ने लहानमुलांमधील अपंगत्व निर्मूलनाचा ध्यास मनाशी घेतला. विशेष सांगाव्याचे झाल्यास हि सेवा समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचेल आणि सामान्य जनतेला परवडेल याची विशेष काळजी घेतली आहे. त्याच प्रमाणे ‘आरोग्य मित्र विभाग ‘ रुग्णालयात सुरु केला आहे. जेणेकरून आर्थिक बाजू कमकुवत असणाऱ्या कुटुंबासाठी हा विभाग देशभरातून अनेक सामाजिक संस्थे सोबत समन्वय साधून लहान मुलांसाठी शस्त्रक्रियेसाठी निधी उभारण्यासाठी मदत करतो. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णावर उपचार घेणे सोपे जाते. हि सेवा सुरु झाल्याने उत्तर महाराष्टातील गरजू रुग्णांना मुंबई पुणे महानगराची धावपळ यामुळे टळत आहे.
डॉ निखिल चल्लावार म्हणतात, समृद्ध आयुष्य आणि धष्टपुष्ट शरीर हि देवाची देणगी आहे असं आपण ग्राहय धरून चालतो. पण याची खरी किंमत हि एका अपंग व्यक्तीला माहिती असते त्याला हि देणगी लाभलेली नसते. जन्मजात अस्थिव्यंगाचे आजार हे समाजामध्ये आज पर्यन्त देवाचा प्रकोप मानला जाई, परंतु आधुनिक विज्ञानाने नवीन तंत्राच्या साहाय्याने या अपंगावर यशस्वी रितिने मात केली आहे, लहान मुलांमधील या व्याधी निवारण होण्यासाठी देशभरातील सामाजिक संस्था या पुढे सरसावलेल्या आहेत असामान्य परिस्थिती मध्ये आर्थिक कारणाने बहुतांश लहान मुलांवर उपचार होत नाहीत हाच दुवा घेऊन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ने अशा लहान मुलांना शोधून त्यांच्यावर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया केल्या आहेत.
डॉ निखिल चल्लावार यांनी या लहान मुलांच्या अस्थिव्यंग मध्ये प्रामुख्याने क्लब फूट, सेरेब्रल पाल्सी , स्कोलियोसिस , या जन्मजात आजारावर योग्य उपचार त्यांनी केले आहेत. जन्मजात पाय वाकडे असणे म्हणजेच याला क्लब फूट असे देखील म्हणतात.वेळीच निदान झाल्यास सर्जरीच्या सहाय्याने हा जन्मदोष दूर करता येऊ शकतो. त्याच प्रमाणे सेरेब्रल पाल्सी हा सुद्धा जन्मजात आजारातील व्यंग आहे. या आजारात शरीराची हालचाल, संतुलन आणि स्नायूंच्या टोनवर परिणाम होतो. ‘सेरेब्रल’ म्हणजे मेंदूशी संबंधित विकार, आणि ‘पाल्सी’ म्हणजे कमकुवतपणा किंवा स्नायूंची समस्या. सेरेब्रल पाल्सी मेंदूच्या अशा भागात सुरू होते जिथून स्नायू हलविण्याची क्षमता नियंत्रित होते. मेंदूचा भाग पाहिजे तसा विकसित होत नाही किंवा जन्माच्या वेळी किंवा नंतर काही अडचणी आल्यास सेरेब्रल पाल्सीची समस्या उद्भवू शकते. काहीजणांना जन्मजात सेरेब्रल पाल्सी असते. तर काहींना जन्मानंतर हा त्रास सुरू होतो. हा आजार गंभीर स्वरूपाचा असला तरी योग्य वेळी उपचार केल्यास निश्चितच चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे निराश न होता औषधोपचार, आहार व व्यायाम या गोष्टींमध्ये सातत्य ठेवल्यास आपण सेरेब्रल पाल्सिग्रस्त बाळाला चांगले आयुष्य नक्कीच देवू शकतो. या मुलांमध्ये आनंद, उत्साह, आत्मविश्वास भरण्याची गरज आहे. दैनंदिन जीवनात व्यायाम, पोषक आहाराचा समावेश करणेही तितकेच गरजेचे आहे.स्कोलियोसिस दुखापत, सेब्रल पाल्सी, किंवा इतर कारणांमुळे पाठीचा कणा वाकणे ही समस्या देखील जन्मजात अनेक लहानमुलांमध्ये असू शकते. या स्थितीला स्कोलियोसिस म्हणतात. या स्थितीत पाठीचा कणा एका बाजूला फिरतो आणि व्यक्ती एका बाजूला झुकलेली दिसते.अश्या विविध विकाराचे निदान व उपचार अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे केले जातात. गरजू आणि आर्थिक बाजू कमकुवत असणाऱ्या कुटुंबासाठी भारतातील अनेक सामाजिक संस्था या कार्यास हातभार लावतात.

लहान मुलामध्ये खालील लक्षणे आढळल्यास मुलांच्या पालकांनी त्वरित अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलशी संपर्क साधावा

१. जन्मापासून हात पाय आणि अंग विकृत असणे

२. हात अथवा पायात वाक असणे.

३. मुलांच्या हाताच्या,पायाच्या हालचाली सुरळीत होत नसल्यास

४. जन्मापासून हात किंवा पाय न हलवणे

५. १८ वर्ष वयोगटाखालील मुलांमध्ये फ्रॅक्चर असणे.

६. हाताची, पायाची लांबी एकसारखी नसणे

– ह्या गोष्टी निश्चित लक्षात ठेवा :

१. बाळाच्या आणि लहान मुलांच्या विकृतींवर उपचार आहेत.

२ विकृती घालवण्यासाठी बाहेरच्या शहरात अथवा देशात जाण्याची आवश्यकता नाही.

३ आता आपल्या शहरात उपचार उपलब्द्ध आहेत.

४ विकृती लक्षात आल्यावर त्वरित उपचार सुरु करावेत.

५ जेवढ्या लवकर उपचार होतील तेवढ्या लवकर अडचणी कमी होतात
सुधारित समाज किंवा देश आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा समाजातील एकही घटक स्वतःला हीनदीन समजता कामा नये. प्रत्येक अपंग मनुष्यात स्वाभिमान जागृत झाला पाहिजे आणि स्वकष्टाने त्यांनाही आयुष्य जगता आले पाहिजे.

डॉ निखिल चल्लावार
लहानमुलांचे अस्थिविकार व शस्त्रक्रिया तज्ञ
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल , नाशिक

 

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News