सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अद्ययावत आणि विस्तारित सुविधासाठी सज्ज

Aug 10, 2022

4के लॅप्रोस्कोपिक सर्जिकल सिस्टिम ,कमीत कमी छेद असणारी हृदय शस्त्रक्रिया सुविधा

नाशिक : नागरिकांना सर्वोत्कृष्ट दर्जाच्या आरोग्य सुविधा व सेवा पुरविण्याच्या आणि उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता दूर करण्याच्या उद्देशाने सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अद्ययावत आणि विस्तारित आरोग्य सुविधा सुरू केल्या. सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,नाशिकचे वैद्यकीय संचालक डॉ.प्रसाद मुगलीकर आणि सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,नाशिकचे सहाय्यक उपाध्यक्ष संजय चावला यांनी आज पत्रकार परिषदेत या नवीन,विस्तारित सुविधा आणि नवीन उपक्रमांची घोषणा केली. याप्रसंगी सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या इंटर्नल मेडिसिन अ‍ॅन्ड क्रिटिकल केअर विभागाचे कन्सल्टंट व फिजिशियन डॉ.अभिषेक पिंप्राळेकर, जॉईंट रिप्लेसमेंट विभागाचे कन्सल्टंट डॉ.प्रकाश पाटील, न्युरो व स्पाईन सर्जन डॉ.समीर फुटाणे, क्रिटिकल केअर,रेस्पिरेटरी मेडिसिन आणि इंटर्नल मेडिसिनचे सिनियर कन्सल्टंट आणि पल्मोनोलॉजी आणि क्रिटिकल केअर विभागाचे संचालक आणि वैद्यकीय सेवा प्रमुख डॉ.भरत त्रिवेदी , कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जरी विभागाचे संचालक व हृदयरोग शल्यविशारद डॉ.राहुल कैचे, वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट व कन्सल्टंट डॉ.आशुतोष साहू, न्युरोलॉजी आणि इंटरव्हेंशनल न्युरोलॉजीचे कन्सल्टंट डॉ.श्रीपाल शहा, मिनिमल अ‍ॅक्सेस,गॅस्ट्रोइंस्टेटिनल,थोरॅसिक अ‍ॅन्ड लेझर सर्जन आणि जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी विभागाचे संचालक डॉ.जी.बी.सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

या अद्ययावत आणि विस्तारित सुविधांमध्ये 54 खाटांची क्षमता असलेला आधुनिक अतिदक्षता विभाग, उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत कॅथ लॅब, 100 नवीन बेडससह 204 बेडसची क्षमता, 4के लॅप्रोस्कोपिक सर्जिकल सिस्टिम (उत्तर महाराष्ट्रात प्रथमच), कमीत कमी छेद असणारी हृदय शस्त्रक्रिया सुविधा, 5 -फंकशन मोटराईज्ड बेड( विविध आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या सोयीसाठी , पाच वेगवेगळ्या प्रकारे हलवता येणारे बेड्स), सर्व विमा कंपन्यांशी सहयोग करून कॅशलेस सुविधा यांचा समोवश आहे. हॉस्पिटलला याआधीच कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सर्जरी, क्रिटिकल केअर आणि पल्मोनोलॉजी, इंटर्नल मेडिसिन, न्यूरोलॉजी आणि न्युरोसर्जरी, जनरल सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट, ट्रॉमा आणि ऑर्थोपेडिक सर्जरी, ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि इतर उपचारांसाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून ओळखले जाते. यकृत प्रत्यारोपण करणारे हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय आहे आणि आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक यकृत प्रत्यारोपण केले आहेत. नुकतेच प्रगत मधुमेह आणि एंडोक्रिनोलॉजी क्लिनिक देखील येथे सुरू करण्यात आले आहे.

यानिमित्ताने सह्याद्रि हॉस्पिटलने सह्याद्रि हेल्थ फर्स्ट कार्ड देखील सुरू केले आहे,ज्यामध्ये रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी लॅब चाचण्या, ओपीडी कन्सल्टेशन यावर सवलत मिळणार असून याचा कालावधी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल.

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,नाशिकचे सहाय्यक उपाध्यक्ष संजय चावला म्हणाले की,ज्यावेळी आम्ही एखाद्या नवीन वैद्यकीय उपक्रम सुरू करतो तेव्हा तंत्रज्ञान व कार्यक्षम आरोग्यसेवेसह रूग्णांची सोय आणि सहकार्य करण्यावर आमचा भर असतो. हे केवळ नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत अद्ययावत आरोग्य केंद्रांपैकी एक असेल. रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन एकाच छताखाली अद्ययावत व विस्तारित आरोग्य सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.उदा. क्युबिकल जनरल वॉर्डसह सेंट्रलाईजड एसी आणि अटेंडंट बेडची व्यवस्था असणारे सह्याद्रि हॉस्पिटल्स नाशिक हे शहरातील पहिले असे रूग्णालय आहे.तसेच आयसीयू इंटेसिव्हिस्ट असणारे देखील परिसरातील पहिले रूग्णालय आहे.

याप्रसंगी बोलताना सह्याद्रि हॉस्पिटल्सचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसाद मुगलीकर म्हणाले की,नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक आरोग्य केंद्र म्हणून विकसित होत आहे.या विस्तारामुळे याला अधिक चालना मिळेल आणि या भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. रूग्णालयांची एक प्रमुख साखळी म्हणून,आम्ही नागरिकांना सर्वोत्कृष्ट तज्ञांसह जागतिक दर्जाच्या सेवा प्रदान यापुढेही करत राहू. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि लोककेंद्रित उपक्रमांवर आमचा भर असून यामुळे आमचेे नागरिकांशी असणारे नाते अधिक दृढ होईल.

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने...

read more
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे किडनी प्रत्यारोपण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय...

read more
अत्याधुनिक मिसो रोबोटिक तंत्रज्ञानव्दारे जॉइंट रिप्लेसमेंट करणे झाले आणखी सोपे ;किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये सिस्टीमचा शुभारंभ

अत्याधुनिक मिसो रोबोटिक तंत्रज्ञानव्दारे जॉइंट रिप्लेसमेंट करणे झाले आणखी सोपे ;किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये सिस्टीमचा शुभारंभ

नाशिक : किम्स मनवता हॉस्पिटल, नाशिकने प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा...

read more
Breaking News