स्वामी लीला ||
स्वामी महाराज हिमालयात असतांना एका गुहेच्या शेजारी असलेल्या वृक्षाखाली स्व स्वरूपाच्या आनंदात रममाण झालेले होते.. स्वामी भक्त हो !! त्याच परिसरात एक हरणाचे जोडपे आणि त्याचं एक छोटास गोंडस पिल्लू रहात होते.. त्याच वेळेला हरणाच्या पिल्लाची आणि जोडप्याची चुकामुक होते.. हरणाचे पिल्लू उड्या मारत मारत दूर जंगलात दिसेनासे होते.. आपल बाळ दिसत नाही.. हे बघून हरणाचे जोडपं व्याकूळ होऊन त्याला सैरावैरा शोधू लागत…असो. इकडे चार शिकाऱ्यांची नजर ह्या छोट्याश्या- गोंडस हरणाच्या पिल्लावर पडते.. आणि बंदूक हातात घेऊन ते त्याचा पाठलाग करू लागतात.. हरणाचे पिल्लू जीव मुठीत धरून रस्ता मिळेल तिकडे पळण्यास सुरुवात करते.. तो त्याला स्वामी महाराज झाडाखाली बसलेले दिसतात…स्वामींना बघताच.. ते हरणाचे पिल्लू थेट स्वामींच्या मांडीवर येवून बसते… स्वामी त्याला दोन्ही हाताने प्रेमाने कुरवळतात .. त्याच्या वरून मायेने हात फिरवतात.. असो. इकडे हे चार शिकारी त्या पाडसाचा पाठलाग करत करत स्वामींच्या जवळ येतात.. त्या पिल्लाला आमच्या स्वाधीन करा असे ओरडून सांगतात.. पण स्वामी भक्त हो !! स्वामींनी त्यांना काहीच प्रतिसाद देत नाही.. स्वामींनी त्यांच्या कडे दुर्लक्ष केले.. स्वामी भक्त हो !! हरणाच्या गोंडस पिल्लाच्या डोळ्यात आपण प्रत्यक्ष परब्रम्हाच्या कुशीत असल्याची एक प्रकारची निडरता शिकाऱ्यांना स्पष्ट दिसत होती.. असो. आता मात्र शिकारी चवताळतात आणि जोराने हवेत गोळी झाडण्यास सुरुवात करतात… स्वामी भक्त हो..!! त्यांच्या कोणत्याही कृत्याचा ना स्वामींवर परिणाम होत होता… ना त्या हरणाच्या पाडसावर..!! असो. आता मात्र स्वामीनी एक लीला केली.. स्वामीनी त्या शिकाऱ्यांच्या दिशेला दोन खडे फेकले तो चमत्कार झाला.. चारही शिकारी हातात बंदूक घेतलेल्या अवस्थेत तटस्थ झाले.. त्यांचे शरीर काष्ठा प्रमाणे कडक झाले.. त्यांच्या सर्व हातापायांची हालचाल बंद झाली… अहाहा स्वामी भक्त हो !! काय स्वामींची लीला हि..!! असो. काही वेळाने स्वामींना त्यांची द्या आली आणि त्यांच्याकडे कृपा दृष्टीने बघताच त्यांना पूर्वस्थितीत पुन्हा आणले… स्वामी भक्त हो !! हि स्वामींची लीला बघून चारही शिकाऱ्यांचा अष्टभाव दाटून आला.. त्यांनी स्वामींच्या चरणी लोटांगण घातले.. आणि नाक घासून माफी मागितली.. तेव्हा स्वामी त्यास उपदेश केला कि “ सर्व भूतमात्रा बद्दल प्रेम भाव ठेवा !! ” आणि जाण्यास सांगितले.. असो. इकडे हरणाचे जोडपे त्यांच्या पाडसाला शोधत शोधत स्वामींच्या जवळ येतात.. तो स्वामी त्यातील हरणाकडे बघून बोलतात कि, “ काय ये ब्राम्हणा आम्हाला ओळखतो कि नाही.. अरे तू आमचा भक्त आहेस.. गाणगापुरात आमची सेवा करून रोग मुक्त झाला होतास..!! अरे तू पूर्वी सत्पुरुषांचा छळ केला होतास म्हणून तुला हा हरणाचा जन्म मिळाला..!! ” स्वामी भक्त हो !! स्वामींचे हे वाक्य ऐकताच हरणाच्या डोळ्यांतून अश्रू सुरु झाले हो… त्या नंतर पुन्हा स्वामी त्यास बोलले कि “ आता ह्या नंतर तुम्हाला पुन्हा मानवाचा जन्म मिळेल.. त्या वेळेला आम्ही दक्षिण देशात आलो कि तुम्हाला पुन्हा भेटेल…” स्वामी भक्त हो !! कशी स्वामींची लीला… काय आणि कसे वर्णन करावे शब्दच सुचत नाही …!! असो. ह्या नंतर ते जोडपे आणि छोटास गोंडस पाडस आनंदाने उड्या मारत मारत जंगलात जातात.. धन्य आहात स्वामी..!! धन्य तुमच्या लीला..!!
स्वामी बोध ||
स्वामी भक्त हो !! आजचा स्वामी बोध !! स्वामीभक्त हो !! वरील स्वामी लीलेतून स्वामी आजच्या पिढीसाठी… आपणासाठी हेच सांकेतिक रुपात आधार देत सांगत आहेत कि…” बाळानो !! तुमची माझ्यावर अनन्य भक्ती आहे ना…!! तुमचा माझ्यावर अतूट विश्वास आहे ना..!! तर मग नि:शंक रहा… मी तुमचे त्या गोंडस हरणाच्या बाळा प्रमाणे रक्षण करेल.. जीवनात कितीही संकट रुपी ‘शिकारी’ येवु देत…. तुम्ही फक्त त्या हरणाच्या पाडसा सारख निर्भय होऊन माझ्या कुशीत बसून राहा… तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही…!! ह्याची ग्वाही देतो..!! “ स्वामी भक्त हो !! जाता जाता हेच सांगावेसे वाटते कि.. अहो.. वरील प्रसंग बघता हे लक्षात येते कि मुक्या प्राण्याला समजते कि..त्याचा खरा आश्रयदाता कोण आहे..!! आपण तर विवेकी मानव आहोत.. त्यात नशिबाने स्वामींच्या सेवेत आहोत.. मग आता कशाचीच भीती बाळगायची नाही.. संकटांना डगमगायाचे नाही.. जीवनात मोठी मोठी कल्याणकारी धेय्य ठेवून कर्म करायचे… आपल्याला यश येणारच हा विश्वास ठेवायचा.. कारण आपल्या पाठीशी आता प्रत्यक्ष परब्रम्ह स्वामी स्वतः आहेत.. कारण तेच बोलतात.. भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे..!! धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद..!!
संदर्भ –www.SwamiVaani.com





