स्त्री-पुरुषांसाठी मोफत विवाहपूर्व व प्रसूतीपूर्व समुपदेशन केंद्राची सुरुवात डॉ अभय सुखात्मे यांचा सामाजिक उपक्रम

Jul 26, 2019

नाशिक – समाजातील अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी अनेकजण नेहमीच पुढे येऊन नि:स्वार्थपणे कार्य करतात. ज्याचा फायदा समाजास होत असतो. आपण गेल्या ३० वर्षातील वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवावरून समाजरचनेचा पाया असलेली विवाह संस्था सुदृढ रहावी याकरिता स्त्री-पुरुषांसाठी मोफत विवाहपूर्व व प्रसूतीपूर्व समुपदेशन केंद्राची सुरुवात करत असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अभय सुखात्मे यांनी केले.

   ते पुढे म्हणाले की, विवाहापूर्वी अनेक गैरसमज, चालीरीती तसेच गुगल डॉक्टर यावरील अर्धवट माहिती यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. तज्ञांकडून द्विपक्षीय समुपदेशन न झाल्याने ब-याच समस्या वाढतात.

  बदलेली जीवनशैली जसे लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करणे, जीन्स सारखे हवा खेळती न राहणारे कपडे अधिक कालावधी करिता वापरणे यामुळे पुरुषांमधील वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. स्त्रियांमध्ये जागरण, अवेळी खाणे, फास्टफूड, सेल्फ मेडीकेशन, व्यायामाचा अभाव हि देखील वंध्यत्वाची कारणे आहेत. प्रसुतीमधील अडचणीसाठी पण प्रसूतीपूर्व समुपदेशन अत्यंत महत्वाचे आहे. हे समुपदेशन झाल्यानंतर जर गर्भ राहिला तर गुंतागुंतीची शक्यता बरीच कमी होते असेही ते म्हणाले.

   अनेकदा प्रसुतीबाबत योग्य नियोजन न केल्याने गर्भधारणा हा अपघात ठरतो. बरेचदा प्रसूतीपूर्व शारीरिक तपासण्या केल्यास बरेचसे आजार जसे थायलसिमिया, सिकलसेल, हेपीटाईटीस बी व सी, एचआयव्ही संततीस होण्याची शक्यता टाळता येते.

   उशिरा होणारी गर्भधारणा, स्थूलपणा, पिसिओडी अशा अनेक बाबींवर देखील योग्य प्रसूतीपूर्व समुपदेशनाने मार्ग काढता येऊ शकतो. त्यामुळे गर्भधारणेचे योग्य नियोजन केल्यास प्रसूती सुलभ होऊ शकते. अशाच सर्व अनुभवातून मग अशा प्रकारच्या समुपदेशन केंद्राची संकल्पना सुचली व हि मोफत देण्याचे ठरवीले. सुरुवातीला दर शुक्रवारी संध्याकाळी ५ ते ७ दरम्यान स्त्री-पुरुष गंगापूर रोड वरील हॉस्पिटल मध्ये येऊन त्याचा लाभ घेऊ शकतात. पालकांनी देखील सोबत आल्यास समुपदेशन अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते.

   याआधी पण डॉ अभय सुखात्मे अनेक सामाजिक संस्थांसोबत कार्यरत असून यामध्ये आयुर्वेद महासंघाच्या रुग्णालयात मोफत सेवा, स्त्री आरोग्य विषयक अनेक मार्गदर्शनपर कार्यक्रम, पौगंडावस्थेतील युवक-युवतींना मार्गदर्शन या काही प्रमुख आहेत.

अधिक माहिती साठी संपर्क –  ०२५३-२५७०४११   

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News