का ? धोत्रा (धतूरा) शिवलिंगवर वाहतात विषारी असून ही अनेक आजारांवर उपयोगी,गळालेले केस पुर्ननिर्मिती करण्यासाठी बहुगुणी

Jul 26, 2019

धोत्रा आयुर्वेदिक वनस्पती बाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. श्रावण महिन्याच्या औचित्यार्थ लोकांनी जास्तीत जास्त शिवपुजा करतांना देवाला अपर्ण करावे या उदेशाने धोत्राचे विविध औषधी गुण उपयोग व फायदे यांची माहिती घेणार
आहोत.
महादेवाला प्रसन्न करण्‍यासाठी विशेष पुजा वस्तुमध्ये धोत्राल्या महत्व आहे. जिसे बेलपत्र,सफेद फूल भगवान शिवला आवडते त्याच बरोबर धोत्रा फळ वाहने शुभ मानले जाते. बेलपान बरोबर धोत्रा महादेवाला प्रिय आहे. धोत्रा विषारी असले तरी सनातन
हिंदु धर्माशी यांचा संबध जोडला आहे. समुद्र मंथन करतांना सर्व विष सागरात फैलत चालले होते तेव्हा जगाचे रक्षा करण्यासाठी महादेवांनी समुद्रातील पाण्‍यात उतरुन पाण्यातील विषपान करुन जगाचा उध्दार केला.
महादेवाने विषपान करुन जगाला परोपकार, उदारता आणि सहनशीलतेचा संदेश दिला. महादेवाच्या पुजेत धोत्रा सारखे विषारी फळ वाहण्‍या मागिल हिच धारणा असून व्यक्तीने या जगात जीवन जगतांना व्यक्तीगत, पारिवारीक आणि सामाजिक कटू
व्यवहार,वाणीचा त्याग करावा.केवळ स्वार्थी भावना अंगी न ठेवता सदैव इतरांचे सुखांचा पण विचार करणे आवश्यक आहे.तेव्हा आपल्या बरोबर दुस-यांचे जीवन सुखी करता येईल.हया धारणे मुळेच महादेवांना धोत्रा प्रिय आहे.सर्वांनी शिवमंदिरात जाऊन
शिवलिंगावर धतूरा वाहून आपल्या मनातील आणि विचारांतील कडवटता काढून सात्वीकेतेचा स्वीकार करावा.तेव्हा खरी शिवपुजा यशस्वी होउन शिव शब्दानुरुप सुख,कल्याण व आपलेपणाचे भावनेशी जुडता येईल.
औषधी उपयोग –धोत्रा वनस्पती भांग बनविण्यासाठी उपयोग केला जातो.त्याच बरोबर आयुर्वेदिक उपाय म्हणून खुप प्रकारचे औषांधामध्ये धोत्रा वापरला जातो.दमा, सुज, गर्भधारणा, फिट, मुळव्याध, कमजोरी, आदि व्याधी साठी उपयोग केला जातो. कान दुखी पासून ते डोक्याची केस गळती, टक्कल वर पुर्न केस येण्यासाठी उपयोग होतो.
धोत्राच्या फळांचा रस डोक्यावर लावा तर टक्कल पडलेलेल्या जागी पुन्हा केस येतात. केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी उपयोग होतो. धोत्राच्या झाडांची पाने जाळून त्याचा धुर बवासीरच्या जागेवर शेक घेतल्यास फायदा होतो.
धोत्राच्या रस तिळाच्या तेलात मिक्स करुन दुखण्याजागेवर अथवा सुजेवर लावल्यास आराम मिळतो.
बोलले जाते की 2.5 ग्राम धतूरेच्या चुर्णा आणि तुप मिक्स करुन रोज घेतल्यास ज्या महिलांना गर्भधारणा होण्यास समस्या आहे.त्यांना फायदा मिळतो.
डोळयातील सुज,संसर्ग आदि समस्या दुर करण्यासाठी धोत्राच्या 1 थेंब टाकल्यास फायदा होतो.
ताप किंवा कफ झाल्यावर 125-250 मिलीग्राम धोत्राची बियांचे चुर्ण रुग्णाला दिले तर ताप आणि कफ निघून जातो.
टिप – धोत्रा वनस्पती विषारी आहे.त्यामुळे आयुर्वेदिक उपाय करतांना डॉक्टरांच्या सल्लाने करावे. अन्यथा घातक परिणाम होऊ शकतात.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News