होप मुंबई ओन्कॉकेअर कर्करोगग्रस्तांसाठी अदयावत उपचार व सोयी सुविधांसाठी सज्ज

Aug 22, 2022

नाशिक : होप मुंबई ओन्कॉकेअर नाशिक ही कर्करोगग्रस्त यांना उच्चशिक्षित कर्करोग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अद्यावत सुविधा सज्ज अश्या ठिकाणी सुरक्षित वातावरणात आणि वाजवी दरात उपचार देणारी साखळी स्वरूप डे केअर संस्था आहे. ही संस्था नाशिकमध्ये वरिष्ठ कर्करोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे .

डॉ. पेठे हे गेले ११ वर्ष कर्करोग ग्रस्थांच्या रुग्णसेवेत कार्यरत असून रुग्णांना उपचार घेणं अधिक सुखकर करिता यावे या दृष्टीने ४ वर्षापूर्वी मुंबई ओन्कोकेअर या संस्थेशी हातमिळवणी करत नाशिक मधील पहिल्या कँसर डे केअरची स्थापना केली.

होप मुंबई ओन्काकेअर डॉ. पेठे यांनी उपचार करून कर्करोगमुक्त केलेल्या व गेली काही वर्ष निरोगी आयुष्य जगणाऱ्या २०० हून अधिक रुग्णांचा जाहीर गौरव करण्याच्या हेतूने दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी स्नेहबंध सोहळा आयोजित केला आहे

. कर्करोग सारख्या भयाण आजाराला धैर्याने सामोरे जाऊन जिद्दीने दोन हात करीत त्यातून पूर्णपणे बाहेर पडणाऱ्या शुर रुग्णांचा सत्कार करणे आणि त्या माध्यमातून “कर्करोग पूर्ण बरा होऊ शकतो” असा सकारात्मक संदेश समाजात पोहचविणे ह या सोहळ्याचा मूळ हेतू आहे

या प्रसंगी स्वतः डॉक्टर असणारे आणि या आजारातून बरे झालेले काही रुग्णांनी ही सहभाग घेतला होता. या सोहळ्या करिता एम ओ सी फाऊंडेशन या कर्करोगग्रस्त ना आर्थिक मदत पुरवणाऱ्या सेवाभावी संस्थेचा ही हातभार लागणार आहे या सोहळ्यामार्फत अपेक्षित असलेला सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहचावा आणि त्यातून प्रेरणा घेऊन इतर कर्करोग ग्रस्थानी ही या आजाराशी धैर्याने लढा देण्याची तयारी करावी असा आमचा माणस आहे – डॉ. चंद्रशेखर पेठे वरिष्ठ कर्करोग तज्ञ
, डॉ. सोनल धांडे कर्करोग तज्ञ

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News