अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे “मातृत्व” कार्यशाळेचे आयोजन

Aug 25, 2022

नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे  “मातृत्व” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ३० दाम्पत्यांनी हजेरी लावली होती  गरोदर माता आणि त्यांच्या जोडीदाराच्या मनातील शंका आणि प्रश्न विचारात घेऊन उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रथमच मोठ्या स्तरावर गरोदर मातांसाठी ‘सुरक्षित मातृत्व’ हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या कार्यक्रमाला “मातृत्व” असे नाव देण्यात आले होते या कार्यशाळेत  गरोदर स्त्रिया आणि त्यांच्या जोडीदारांनी  तज्ज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

          डॉ सुशील पारख हे उपस्थित जोडप्याचे  मार्गदर्शन करताना म्हणाले कि,  गर्भधारणापूर्व समुपदेशन , प्रसूती पूर्व चाचणी, सुखरूप प्रसूती , पोषण व आहार ,  व्यायाम ,  नवजात शिशु चे संगोपन ,व  प्रसूती पश्चात घेण्यात येणारी काळजी , या सर्व सुविधा जर एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास माता व नवजात शिशु यांच्यावर योग्य उपचार करण्यास सोईचे जाते , याच प्रमाणे जर  प्रसूती पूर्व चाचणी मध्ये गरोदर मातेस उच्च रक्तदाब किंवा इतर  व्याधी  असल्यास त्याचे योग्य निदान करून सुखरूप प्रसूती करता येते , मुदतीपूर्व  प्रसूती झाल्यास  नवजात शिशू ला ICU ची गरज पडल्यास बाळाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी जो महत्वाचा वेळ वाया जाऊन बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जर या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास माता आणि नवजात शिशु यांच्या आरोग्याचे संभाव्ये धोके टाळता येऊ शकतात.

          या कार्यशाळेत स्रीरोग व प्रसूतीशास्र तज्ञ् डॉ मनोज पापरिकर , डॉ श्रीकला काकतकर , डॉ प्रणिता संघवी , डॉ उझ्मा शेख , डॉ कुणाल आहिरे , नवजात शिशु व बालरोग तज्ञ् डॉ सुशील पारख ,फिजोथेरीपिस्ट डॉ रोहन देव ,पोषण व आहार तज्ञ् साक्षी भाबांरे , गर्भसंस्कार प्रशिक्षिका डॉ वैदेही देवधर.यांनी सुरक्षित मातृत्व यावर सखोल मार्गदर्शन करून विशेष दाद मिळवली. “मातृत्व”  कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी आशिष सिंग , आशना नायडू , राधिका मेहरुलिया , विश्वानंद साळवे  आणि विपणन विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने...

read more
Breaking News