महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाज महासंघ (सर्व भाषिक) आणि नाशिक जिल्हा धोबी समाज महासंघ यांच्या तर्फे नाशिकमध्ये राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा आणि स्नेह मेळाव्याचे आयोजन

Aug 25, 2022

नाशिक  :महाराष्ट्र राज्य  धोबी (परीट)  समाज महासंघ (सर्व भाषिक) आणि नाशिक जिल्हा धोबी समाज महासंघ यांच्या तर्फे आणि नाशिकचे प्रसिद्ध व्यावसायिक राजेंद्रसेठ आहेर यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये दिनांक २७ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा आणि स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  नाशिकच्या गंगापूर रोड येथील लक्ष्मी नारायण बँक्वेट हॉल (बालाजी लॉन्स)  येथे आयोजित या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील धोबी (परीट)  समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात येणार आहे. यामध्ये कला,  क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण  क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्यांचा समावेश असणार आहे.  त्याचप्रमाणे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवून शासकीय, निम शासकीय क्षेत्रात अधिकारी म्हणून निवड झालेले समाज घटक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेले खेळाडू यांनाही गौरवण्यात येणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून आपले नियमित कामकाज करतांना  परिसराची नियमित  स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता दूत यांनाही गौरवण्यात येणार आहे.  तसेच राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळावा यासाठी चित्रकला स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले आहे.  चार गटात होणाऱ्या या स्पर्धामध्ये पाहिले तीन क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके आणि प्राविण्य प्रमाणपत्र देऊन त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाचे उदघाटन आरक्षण कृती समितीचे प्रमुख मा. श्री. आशिष (भाऊ) कदम यांच्या हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध उद्योजक मा.श्री राजेंद्र सेठ आहेर हे  भूषवणार आहेत. प्रमुख आथिति म्हणून महाराष्ट्र राज्य  धोबी(परीट) समाज महासंघघाचे संस्थापक अध्यक्ष डी. डी. सोनटक्के, कार्याध्यक्ष अनिल शिंदे, मुख्य सचिव जयराम वाघ, कोषाध्यक्ष संजय कनोजिया, कार्याध्यक्षा सौ. अरुणाताई रायपुरे, रुकेश मोतीकर, भैयाजी रोहणकर सुहास मोगरे, निफाडच्या नगराध्यक्षा सौ. रुपाली रंधवे, शिव छत्रपती पुरस्कार विजेती श्रावणी राऊत, सहाय्यक उपनिबंधक  दिगंबर हौसारे, जिल्हा उप कोषागार अधिकारी पंकज देवरे, लेखापाल व लेखा  परीक्षक  मुकेश परदेशी, मल्लेशकुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या सुटसुटीत नियोजनासाठी  विविध समितीची स्थापना करण्यात आले असून यासाठी महाराष्ट्र धोबी (परीट) महासंघाचे मुख्य महासचिव जयराम वाघ, कला, क्रीडा, सांस्कृतिक प्रमुख मनोज म्हस्के, जिल्हाध्यक्ष योगेश रोकडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शेखर परदेशी, आयोजन सचिव कैलास देवरे, महिला जिल्ह्याध्यक्षा मीनाताई शिंदे त्याचप्रमाणे जिल्हा कार्यकारिणीचे योगेश रोकडे, शेखर परदेशी, सुरेश शिरोडे, रवी सगर,ललित दशेरे, जितेंद्र खैरनार, सौ लता वाघ, सौ. मीना शिंदे, गीता सगर, सौ. आरती सगर आणि सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News