जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Aug 1, 2019

नाशिक – बालरोगतज्ञांची  राष्ट्रीय  संघटना इंडियन  अकॅडमी  ऑफ  पेडीयाट्रिक्स च्या  नाशिक  शाखेतर्फे  १ ऑगस्ट  ते  ७ ऑगस्ट  दरम्यान  जागतिक  स्तनपान  सप्ताह  साजरा  करण्यात  येणार  असून  या  निमित्ताने  अनेक  कार्यक्रमांचे  आयोजन  केले  असल्याची  माहिती  नाशिक  शाखेचे  अध्यक्ष डॉ .संजय आहेर  यांनी  दिली . 
             ते  म्हणाले  कि  स्तनपान हा बालकांच्या  सर्वांगिण  विकासाकरिता  अत्यंत  आदर्श  आहार  असून  जागतिक  आरोग्य  संघटनेच्या  निर्देशानुसार  जन्मानंतर  पहिल्या  एका  तासात  बाळास  पहिले  स्तनपान  मिळाले  पाहिजे .तसेच  वयाचे  पहिले ६ महिने  बाळांना  निव्वळ  स्तनपान  द्यावे  व  सहा महिन्यानंतरच  ताजा ,पोषक  व  घरगुती  घनाहार  सुरु करावा . 
             स्तनपानाचे  बाळ व  आई  या  दोघांसाठी  अनेक  फायदे  असून  याची  जनजागृतीही  या  सप्ताहाच्या  निमित्ताने  करण्यात  येणार  आहे . या सप्ताहात  शहरातील बिटको  हॉस्पिटल ,मायको  हॉस्पिटल ,सिव्हिल  हॉस्पिटल ,ज्योती  हॉस्पिटल ,इ एस आय एस  हॉस्पिटल  येथे  जागृती  व  संवादाच्या  कार्यक्रमाचे  आयोजन  करण्यात  आले  आहे .यासाठी  सचिव  डॉ. संदीप  पाटील ,डॉ . प्रविण  काळे  तसेच  कोषाध्यक्ष  डॉ.  कवीष  मेहता  यांच्यासहित  सर्व सदस्य  कार्यरत  आहेत. 

अजून बातम्या वाचा..

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने...

read more
Breaking News