व्हीएसटीएफ कडून पोषण इंडिया कार्यक्रम व जागतिक स्तनपान सप्ताह मोहिमेचे आयोजन

Aug 1, 2019

व्हीएसटीएफ, रॅकेट बेंकैझर, प्लॅन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण इंडिया कार्यक्रम  व ‘जागतिक स्तनपान सप्ताह’  मोहीम  अमरावती आणि नंदुरबार जिल्यात राबविण्यात येत असून  ती  संपूर्ण  महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे या कार्यक्रमाचा उद्धेश माता आणि बालकाच्या आरोग्य पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे आहे. पोषण इंडिया कार्यक्रम हा आरोग्य आणि   एकात्मिक बाल विकास सेवा ( आयसीडीएस)   विभागाच्या समन्वयांनी प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच  कुपोषण कमी करण्याच्या उद्धेशाने आणि मातेचे उत्तम आरोग्य बाळगण्यासाठी, जागतिक स्तनपान सप्ताह मोहीम दिनांक १ ऑगस्ट  ते  ७ ऑगस्ट २०१९ पर्यत प्रत्येक ग्राम स्तरावर आयोजित करण्यात  येणार  आहे. स्तनपान मोहिमेला प्रभावीपणे राबविण्यासाठी  सक्षम पालक सक्षम बाळ नव्या भविष्यासाठी ‘ हे घोषवाक्य तयार करण्यात आलेले आहे. स्तनपान मोहिमेचा उद्धेश, मातेचे स्तनपानाबद्दल सक्षमीकरण करून, स्तनपानाचे महत्व पटवून देणे असा आहे. तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून स्तनपानाबद्दलच्या  गैरसमजुतीला आळा घालणे आणि स्तनपानासाठी अनुकूल वातावरण तयार करून स्तनपानासाठी उद्युक्त करणे हा आहे.  स्तनपान साप्ताहिक मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी, व्हीएसटीएफ गावातील  मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक हे प्रेरकाची भूमिका बजावणार आहेत. तर अंगणवाडी सेविका या मोहिमेत अग्रस्थानी असून त्या हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवणार आहेत. या जागतिक साप्ताहिक मोहिमेत, प्रत्येक दिवशी एक कार्य करण्याचे प्रायोजित केलेले आहे. सदर कार्यक्रम, अंगणवाडी स्तरावर अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून पार पडणार आहे. जागतिक साप्ताहिक स्तनपान मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक अंगणवाडीला भेट देऊन सदर कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी सेविकेसमवेत समन्वय साधून करणार आहेत. 

     स्तनपान सप्ताह मोहिमेचे नियोजन 

  • १ ऑगस्ट २०१९ ला प्रभात फेरी: स्तनपान सप्ताह साजरा करण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग मिळण्यासाठी स्तनपान मोहिमेबद्दल  घरोघरी जाऊन याबद्दल माहिती देण्यात येईल. यामध्ये, गावातील ग्रामसेवक, सरपंच, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, महिला स्वयंसहायता बचतगट, पात्र जोडपे, अंगणवाडी  सेविका, अंगणवाडी परिवेक्षीका, आशा कार्यकर्ती, आशा परिवेक्षीका, सीडीपीओ, ए.एन.एम, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक, स्तनदा आणि गर्भवती महिला, सामाजिक संस्था आणि इतर इच्छुक व्यक्तींना यामध्ये समाविष्ठ करण्यात येईल . 
  • २ ऑगस्ट २०१९ ला गाव स्तरावर स्तनदा आणि गर्भवती माता यांचे गट तयार करणे: स्तनपान मोहीम अखंडपणे सुरु राहण्यासाठी स्तनदा आणि गर्भवती मातेचे गट अंगणवाडी सेविका तयार करणार आहेत. 
  • ३ ते ५ ऑगस्ट २०१९ ला बाळाच्या पहिल्या १००० दिवसांचे सत्र – सदर कार्यक्रमाचा उद्धेश मातेच्या  बाळाच्या पहिल्या १००० दिवसाबाबत सक्षमीकरण करणे आणि महिलेच्या आरोग्य स्थितीत सुधार करणे तसेच आरोग्य बद्दलच्या गैरसमजूतीला आळा  घालणे हा आहे. सदर सत्र, तीन भागामध्ये विभागले असून, पहिल्या सत्रात ३ ऑगस्ट रोजी गर्भधारणा पासून ते प्रसूतीपर्यतचा  काळ (२८० दिवस), दुसरे सत्र ४ ऑगस्ट रोजी हे बाळाच्या जन्मापासून ते सहा महिन्यापर्यत (१७० दिवस), आणि तिसरे सत्र ५ ऑगस्ट रोजी हे बाळाच्या सहा महिन्यापासून ते २ वर्षापर्यत (५५० दिवस) असे आहे. 
  • ६ ऑगस्ट २०१९ ला पूरक आहार – सदर कार्यक्रमाचा उद्देश स्तनदा आणि गर्भवती मातांना पूरक आहाराबाबत सहज आणि सोप्या पद्धतीने सविस्तर माहिती  सांगण्यात येणार आहे. 
  • ७ ऑगस्ट २०१९ उजळणी सत्र कार्यक्रम – जागतिक स्तनपान सप्ताहच्या शेवटच्या दिवशी उजळणी सत्राचे आयोजन अंगणवाडीत करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात, आरोग्य आणि पोषण याच्या बद्दल केलेल्या समुपदेशनाच्या सविस्तर बाबीची उजळणी  अंगणवाडी सेविका घेतील. 

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News