रंगोदय प्रतिष्ठान, अहमदनगर या संस्थेतर्फे शुक्रवार दि. २३/८/२०१९ रोजी खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धा सकाळी १०.०० वाजता चालू होतील, सदर स्पर्धेची प्रवेश फी ३००/- रु ठेवण्यात आली असून, सदर स्पर्धा रावसाहेब पटवर्धन स्मारक, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर -४१४००३, या ठिकाणी होतील. या स्पर्धेमध्ये प्रत्येक भजनी मंडळाला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत, या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. १५०१/-, प्रमाणपत्र, आणि सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु. १००१/- प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रु. ७५१/-, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ रु.५०१/- सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप असणार आहे, तरी अधिक अधिक भजनी मंडळाने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. अधिक महितीसाठी ९९२२५७१८१३- जयश्री खिस्ती, ९५५२६२४८३८ – अर्जुन डावरे या नंबरवर संपर्क साधावा.
डीएस ग्रुपच्या पल्स कँडीचा गणेश महोत्सवाचा उत्साह; ‘देश की पल्स से बना गणपती त्योहार’ मोहिमेला सुरुवात
नाशिक : यंदाच्या गणेश महोत्सवा निमित्त धर्मपाल सत्यपाल ग्रुप (डीएस ग्रुप) या आघाडीच्या एफएमसीजी...





