नाशिक :- एअरफोर्स असोसिएशन, नासिक चॅप्टरच्या वतीने दि २५ ऑगस्ट २०१९ रोजी संध्याकाळी ठीक ०५. ३० वाजता राका स्क्वेअर, मखमलाबाद रोड , नासिक येथे
या कार्यक्रमात एअर फोर्सच्या सेवेमधून निवृत्त झालेले निवृत्त अधिकारी आणि पूर्व वायुसैनिकांनी निवृत्तीनंतर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त एअर कमांडर एस. के. झा, एअर फोर्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष ग्रुप कॅप्टन एस. एस. फाटक, फ्लाईट लेफ्टनंट सदाशिव के सांबरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एअर फोर्स नासिकचे पूर्व सार्जंट जगन्नाथ सिरसाठ, विष्णू सूर्यवंशी, सुधाकर जाधव, रविंद्र करंजे. दिलीप हिरे तसेच, जे. व्ही. सिंघ आणि सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.




