नाशिक :- नाशिकचे लेखक डॉ. अतुल कणीकर यांनी लिहिलेल्या ” फ्रॉम टेरिबल टू टेरिफिक टीन्स “ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उद्या रविवार दिनांक २५ ऑगस्ट , २०१९ रोजी सकाळी १० वाजता नाशिकच्या शालीमार चौकातील आय. एम. ए. हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. . या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र शासनाच्या अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे प्रमुख सचिव डॉ. नितीन करीर (आय. ए एस.) . मराठी आणि हिंदी नाटक आणि सिनेमाची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि ” सो कुल ” या पुस्तकाची लेखिका सोनाली कुलकर्णी, मेडिसीन फिजिशियन डॉ. चंद्रशेखर फणसाळकर (एम. डी.) , फार्माकालॉजी या विषयाचा ३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. पद्माकर पंडित याच्या हस्ते संपन्न होणार आहे.
” फ्रॉम टेरिबल टू टेरिफिक टीन्स ” या पुस्तकाविषयी सांगायचे झाल्यास यामध्ये लहान वयातून पौंगंडावस्तेत पदार्पण करणाऱ्या मुलांच्या विचारात, वागणुकीत होणारे बदल, त्यांच्या समस्या अश्या विषयावर या पुस्तकामध्ये उहापोह केलेला आहे.
या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहणारे वरील सर्व मान्यवर या विषयाशी संबंदित असल्यामुळे ते यावेळी या विषयावर आपले विचार प्रकट करणार आहेत.
तरी या प्रकाशन सोहळ्यासाठी नाशिककरांनी उपस्थित राहावे असे आवहान करण्यात येत आहे.






