नाशिक :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे या उद्या दि. २७ ऑगस्ट २०१९ रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या नियोजनाबाबत नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय मुंबई नाका येथे आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी आमदार हेमंत टकले,प्रदेश पदाधिकारी विश्वास ठाकूर,शहराध्यक्ष रंजन ठाकरे,जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले,महिला शहराध्यक्ष अनिता भामरे,अर्जुन टिळे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, लक्ष्मण मंडाले, सोमनाथ बोराडे, राजाराम धनवटे, महेश भामरे,अंबादास खैरे, संतोष सोनपसारे,संजय खैरनार, दत्ता पाटील, कैलास मुदलीयर आदी उपस्थित होते.खासदार सुप्रिया सुळे या दि.२७ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून सकाळी ९.३० ते ११ वाजता भोळे मंगल कार्यालय अंबड लिंक रोड येथे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात नाशिक शहर, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. दुपारी ११.३० ते १ या वेळत राष्ट्रवादी कार्यालय मुंबई नाका येथे नाशिक शहर, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता नांदगाव येथे नांदगाव विधानसभा मतदारसंघात संवाद साधणार आहे. या बैठकीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.





