मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित’दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची ‘अतिरिक्त महिला सरस प्रदर्शन व विक्री 2019’ या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. 28 आणि गुरुवार दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शिल्पा नातू यांनी ही मुलाखत घेतली आहे. नवी मुंबईत सुरू असलेले अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री २०१९, या प्रदर्शनाच्या आयोजनामागचा नेमका उद्देश, या प्रदर्शनाला नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद, या प्रदर्शनात असलेली सांस्कृतिक मेजवानी, प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तू, महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न, येत्या काळात राबविण्यात येत असलेल्या योजना, उपक्रम आदी विषयांची माहिती श्रीमती विमला यांनी ‘दिलखुलास’या कार्यक्रमातून दिली आहे.




