‘एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल’ बनतेय अत्याधुनिक दंतोपचाराचे केंद्र

Sep 17, 2022

नाशिक: इन्स्टीट्युट ऑफ डेंटल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटर व हॉस्पिटलमध्ये (एसएमबीटी डेंटलहॉस्पिटल) सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीने दंतोपचार केले जात आहेत. त्यामुळे संवेदनशील आणि वेदनादायक समजल्या जाणाऱ्या दंतउपचारांची भीती आता बाळगण्याची गरज राहिली नाही.

दंतउपचार सुरवातीपासूनच गुंतागुंतीचे आणि दीर्घकाळ चालत आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण या आजारांकडे फारसे गांभीर्याने घेत नाहीत. मात्र, आता सोप्या पद्धतीने आणि कमी कालावधीत हे उपचार करता येणे शक्य झाले आहे.

दातांच्या आजारात प्रामुख्याने दाताला लागलेली कीड, दात दुखणे, हिरड्यांचा आजार आदींचा समावेश होतो. रूट कॅनॉल, दात काढणे, अक्कलदाढा काढणे, जबड्याच्या आणि हाडांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात; तसेच व्यसनांमुळे होणाऱ्या दातांच्या आजारावर देखील उपचार केले जात आहेत. वेडेवाकडे दात असणे किंवा दात एकमेकांत बंद न होणे. अशा दातांमुळे रुग्णाला ते साफ किंवा निरोगी ठेवणे अवघड होते. त्यामुळे दात किडण्याचे व हिरडयांचा त्रास होण्याचा धोका बळावतो.

विशेष म्हणजे, वेदना देणारी दातांची शसक्रिया आता लेझर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होत असून दातांच्या मुळाशी असणारा संसर्ग शंभर टक्के नष्ट करण्यात यश येत आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी दंत महाविद्यालय व दवाखान्यात रुग्णांचा तपासणीसाठी आणि शस्राक्रीयांसाठी कल वाढला आहे.

सर्वसामान्यांसाठी हक्काची दंतचिकित्सा

किडलेले, तुटलेले दात असतील, मुख दुर्गंधी जाणवत असेल, हिरड्यातून रक्त येत असेल, तोंडात जखमा आदी लक्षणे आढळल्यास त्वरित दंतवैद्यांचा सल्ला घ्यावा. दातांचे दुष्परिणाम चेहऱ्याच्या स्नायूंवर, जबड्यावर, डोकेदुखी, मानेचे आजार किंवा पाठदुखी यावरही दिसू शकतात. त्यामुळे दातांचे दुखणे अंगावर न काढता तात्काळ उपचार करून घ्यावेत. – डॉ किरण जगताप, अधिष्ठाता

*अशी घ्या  दातांची  काळजी*

* नियमित दंतवैद्यांकडून दातांची तपासणी करावी.

* तंबाखू, गुटखा आदी व्यसनांपासून दूर राहावे.

* चिकट, गोड आदी पदार्थ टाळावे.

* लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या देऊ नयेत.

* दिवसातून दोन वेळा ब्रश करावा.

   *या समस्या होणार दूर*

  • काळ्याझालेल्या हिरड्यांचा रंग नॅार्मल करता येतो
  • गमीस्माईल (Gummy smile) म्हणजे हसल्यावर हिरड्या जास्त दिसणे व दातांची उंची वाढवणे यावर उपचार शक्य
  • दातांनाचकाकी आणता येणे शक्य
  • टंगटायवर उपचार शक्य
  • दातांनाहोणारी संवेदनशीलता दूर करण्यासाठी होतो लेझरचा वापर.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News