राष्ट्रीय मेडिकल हॅकेथॉन स्पर्धेत एसएमबीटी मेडिकल कॉलेजचे यश

Sep 21, 2022

नाशिक येथील एसएमबीटी मेडिकल कॉलेजच्या प्रथमवर्ष एमबीबीएस विद्याशाखेत शिक्षण घेत असलेल्या सौरभ सरगर याने संशोधन प्रकल्प सादर करत प्रथम क्रमांक पटकावला. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस (UCMS) दिल्ली आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेजचे संशोधन विभाग (MICE LAB) यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे राष्ट्रीय मेडिकल हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सौरभच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 स्पर्धेच्या नियमांनुसार, १२ वेगवेगळ्या विषयांवर देशभरातील बहु-विद्याशाखीय विद्यार्थ्याना नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी सांघिक प्रवेशिका सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते. देशभरातून आलेल्या प्रवेशिकांमधून ११ प्रवेशिका अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या.

 नाशिक येथील एसएम बी टी मेडिकल कॉलेजमधील एम बी बी एस प्रथमवर्षातील विद्यार्थी सौरभ सरगर आणि त्याच्या संघाने सादर केलेल्या “एन्टेरिक म्युको अढेजीव्ह कोटेड कॅप्सुल” या थ्रीडी ऍनिमेटेड प्रकल्प सादरीकरणाने प्रथम क्रमांक पटकावला.

प्रतिदिवस प्रमाणे ठराविक दिवसांसाठी योग्य वेळेत  घ्यावी लागणारी औषधांची मात्रा एकच कॅप्सूल घेऊन मिळवता येऊ शकते, त्यासाठी रोज ठराविक वेळेत औषध घेण्याची गरज भासणार नाही ही संकल्पना या संशोधनातून मांडण्यात आली.  या संशोधनासाठी सौरभ आणि त्याच्या संघाच्या सादरीकरणाने घवघवीत यश मिळवले.

 सौरभच्या मेडिकल कॉलेजमधील प्रथम वर्षातच नाविन्यपूर्ण संशोधन कल्पनेचे आणि अपार मेहनतीचे एसएमबीटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर यांनी कौतुक केले. तसेच सौरभच्या संशोधनातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News