NINE PEARLS हॉस्पिटल रुग्णसेवेत रुजू ; सर्व वैदकिय सुविधा एकाच छताखाली

Sep 22, 2022

नाशिक – नाशिक मधील नामवंत, अनुभवी व आघाडीच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या “नाईन पर्लस् ‘ हॉस्पिटल ‘कॉर्पोरेट सर्व्हिसेस विथ पर्सनल टच’ या ब्रीद वाक्यानुसार चालणारे रुग्णसेवेत रुजू झाले असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली .

नाईन पर्लस् या हॉस्पिटलची संकल्पना ही नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेकडो रुग्णांना गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या नाशिकमधील नामांकित डॉक्टरांची आहे. या डॉक्टरांमध्ये मेंदू रोग तज्ञ डॉ. धनंजय डुबेरकर, चेस्ट फिजिशियन डॉ.दिनेश वाघ, पचनसंस्था व यकृत विकार तज्ञ डॉ. हुसेन बोहोरी , मूत्रपिंड तज्ञ डॉ. नागेश अघोर, हृदय रोग तज्ञ डॉ. राजेंद्र देशमुख, हृदय रोग तज्ञ डॉ.शीतल कुमार हिरण, कर्करोग तज्ञ डॉ. विनायक शेणगे व सांधेरोपण तज्ञ डॉ. योगेश चौधरी यांचा समावेश आहे.

कॉर्पोरेट हेंल्थ सर्व्हिसेस विथ पर्सनल टच-
या सर्व डॉक्टरांनी आजपावेतो शेकडो रुग्णांना व्याधिमुक्त केले असून ‘कॉर्पोरेट हेंल्थ सर्व्हिसेस विथ पर्सनल टच’ या ब्रीदवाक्यानुसार येथे सेवा दिली जाईल. रुग्णांना चांगल्या सुविधां व उपचारा सोबतच योग्य मार्गदर्शन तसेच मानसिक आधाराची तसेच योग्य संवादाची गरज असते . या सर्व गोष्टी नाईन पर्लस् या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असतील असेही येथे आवर्जून नमूद करण्यात आले.

मुंबई नाक्या जवळ वल्लभ नगर मध्ये हे ९५ बेड्स चे सुसज्ज हॉस्पिटल असून येथे असणाऱ्या प्रमुख सुविधांमध्ये, अत्याधुनिक अल्ट्रासाउंड मशीन, लेटेस्ट इंडॉस्कोपी चे मशीन,सांधेरोपणासाठी अत्याधुनिक कॉम्पुटर नेव्हिगेशन चे उपकरण, हृदयावरील उपचारासाठी जपानची अत्याधुनिक प्लॅट पॅनल कॅथलॅब मशीन तसेच सुसज्ज स्ट्रोक युनिट यांचा समावेश आहे. चार लॅमिनर फ्लो असलेली अद्ययावत शस्त्रक्रिया गृह , सहा बेडचे कार्डियाक आयसीयू, 15 बेडचे सुसज्ज डायलिसिस युनिट, डबल पास आर वो फिल्टरेशन प्लांट, किडनी प्रत्यारोपण कक्ष, ॲडव्हान्सड इंडॉस्कॉपी सूट, सुसज्ज ओपीडी इंडॉस्कॉपी सूट, इ इजी, इ एम जी लॅब, सुसज्ज मेंदू विकार विभाग, 50 स्लाईस सिटीस्कॅन मशीन, सुसज्ज श्वसन विकार विभाग, पी एफ टी व स्लिप स्टडी लॅब, सुसज्ज कॅन्सर उपचार विभाग,सुसज्ज लॅबोरेटरी विभाग, फिजिओथेरपी विभाग 38 आय सी यु बेड या प्रमुख आहेत या शिवाय सर्व आघाडीच्या आरोग्य विम्याची सोय देखील उपलब्ध आहे.
अनुभवी व तज्ञ डॉक्टर , अद्ययावत तंत्रज्ञान तसेच कुशल नर्सिंग व सहाय्यक या त्रिसुत्रीचा लाभ हा रुग्णांना होणार आहे

नाईन पर्लस् हॉस्पिटल मध्ये खालील विभाग कार्यरत असतील –

1. न्यूरोलॉजी सेंटर (स्ट्रोक, फिट्स तसेच सर्व मेंदूविकार)

2. रेस्पिरेटरी डिसिज सेंटर (अस्थमा, ॲलर्जी, ब्रोन्कोस्कोपी, स्लीप स्टडी, श्वसनाचे विकार)

3. डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर ( लिव्हर, पचन संस्था एन्डोस्कोपी)

4. किडनी डिसिज सेंटर (मूत्रपिंडाशी निगडीत आजार, डॉमलिसिस , किडनी प्रत्यारोपण.)

5. कार्डिओलॉजी व सीव्हीटीस सेंटर (एन्जिओग्राफी, एन्जियोप्लास्टी, पेसमेकर बायपास व हृदयविकारा संबंधी सर्व उपचार)

6. कॅन्सर केअर सेंटर (कॅन्सर सर्जरी, किमोथेअरपी, रेडिओथेअरपी)

7. ओर्थोपेडिक सेंटर (सांधेरोपण व सांधे बदल, स्पोर्ट्स इन्जुरी, गुंतागुंतीचे व अन्य हाडांचे विकार)

8. क्रिटिकल केअर सेंटर ( सुसज्ज 35 बेडचा आयसीयू)

9. आपत्कालीन व अपघाती विभाग (24 तास सेवा)

NINE PEARLS HOSPITAL
Vallabh Nagar, Near Mumbai Naka, Mumbai Agra Highway, Nashik 06
Phone no. 0253 2226900 , 0253 2993333, 0253 2993939

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News