दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटांट्स ऑफ इंडिया(ICMAI) परीक्षांचा निकाल जाहीर

Sep 28, 2022

nashik : दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटस ऑफ इंडिया तर्फे संपूर्ण भारतभर घेतल्या जाणाऱ्या जुलै २०२२ परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या परीक्षेत नाशिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य क्षेत्रात सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या सिएमए (CMA) परीक्षेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परिक्षांचे आयोजन हे केन्द्र सरकारच्या “दि इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया(ICMAI)” या संस्थेच्या वतीने केले जाते. दि इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया च्या वतीने १२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम फाउंडेशन(Foundation) ही परीक्षा घेण्यात येते. हि परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पुढिल इंटरमेडिएट(Intermediate) परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात.

“दि इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडियातर्फे” जुलैमध्ये अखिल भारतीय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांचा निकाल दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर झाला.

या परीक्षांचा नाशिक विभागाचा निकालांचा तपशील खालील प्रमाणे आहे:

नाशिक विभागातून इंटरमिजीएट परीक्षेसाठी साठी एकुण ३२५ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ३६ विद्यार्थी इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण झाले त्यापैकी प्रथम ३ विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:

इंटर्मिजीएट:
निकिता सावलानी – प्रथम
राजश्री गिरासे – द्वितीय
तेजस कांकरिया- तृतीय

तसेच फायनल च्या परीक्षेला १२७ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले, यशस्वी विद्यार्थ्यांपैकी प्रथम तीन खालीलप्रमाणे आहेत:
अमित त्रिपाठी – प्रथम
ललित जाखडी – द्वितीय
अमोल रानडे – तृतीय

“दि इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया(ICMAI)” च्या नाशिक शाखेचे चे अध्यक्ष सिएमए(CMA) भुषण पागेरे,
स्टुडंट डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सिएमए (CMA) अरिफखान मंसूरी
प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सिएमए (CMA) कैलास शिंदे
मीडिया आणि पब्लिक रिलेशनशिप कमिटीचे अध्यक्ष सिएमए (CMA) निखिल पवार
उपाध्यक्ष सीएमए (CMA) दिपक जगताप
सचिव सिएमए (CMA) अर्पिता फेगडे
खजिनदार सिएमए (CMA) मयुर निकम
सिएमए (CMA) स्वप्नील खराडे
सिएमए (CMA) दिपक जोशी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अभिनन्दन व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन..!!

अधिक माहितीसाठी संपर्क : ०२५३ २५००१५० २५०९९८९
इमेल आयडी: nasik@icmai.in
वेबसाईट: www.icmai.in

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News