विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत अर्ज मागणी

Oct 11, 2022

यशस्वी अर्जदारांना मिळणार त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी रु. २,५०,००० पर्यंतची स्कॉलरशिप

Nasik : लॉरिआल इंडिया कडून आज त्यांच्या ‘फॉर यंग विमेन इन सायन्स’ स्कॉलरशिप (एफवायडब्ल्यूआयएस) २०२२ या विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी मेरिट वर आधारीत स्कॉलरशिप प्रोग्रामच्या नव्या पर्वाची घोषणा केली लॉरिआल इंडिया कडून या कार्यक्रमा अंतर्गत अर्ज मागवण्यात येत असून यामध्ये यशस्वी होणार्‍या मुलींना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी रु २,५०,००० पर्यंतची स्कॉलरशिप प्राप्त होणार आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील लॉरिआल युनेस्को फॉर ‍विमेन इन सायन्स’ भागीदारीचा पुढचा भाग म्हणून या कार्यक्रमा अंतर्गत विज्ञान क्षेत्रात भविष्यात काम करु इच्छिणार्‍या महिला त्यांचे स्वप्न साकार करता यावे यासाठी सहकार्य करण्यात येत आहे.

२००३ मध्ये भारतात सुरु करण्यात आलेल्या ‘फॉर यंग विमेन इन सायन्सेस’ स्कॉलरशिप (एफवायडब्ल्यूआयएस) कार्यक्रमा मुळे विज्ञान क्षेत्रात पदवी प्राप्त करु इच्छिणार्‍या गरजू मुलींना आता त्यांच्या आवडीच्या विज्ञान संस्थेत शिक्षण घेता येणार आहे. हा कार्यक्रम विज्ञान क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रात म्हणजे प्युअर सायन्सेस, ॲप्लाईड सायन्सेस, इंजिनियरींग आणि मेडिसिन सह अन्य क्षेत्रासाठी उपलब्ध आहे.

लॉरिआल इंडिया च्या कॉर्पोरेट अफेअर्स आणि एंगेजमेंट्स चे संचालक कृष्णा विलासिनी भारद्वाज यांनी सांगितले “लॉरिआल मध्ये आम्ही नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की खरे सौंदर्य म्हणजे शक्तीशाली बनवणे आणि आम्ही लॉरियल मध्ये तसेच आसपासच्या जगातील महिलांना शक्तीशाली करण्यासाठी वचनबध्द आहोत. आज विज्ञान क्षेत्रात समान प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत आणि स्टेम एज्युकेशन मिळवणे ही महिलांसाठी खूपच आव्हानात्मक बाब आहे. त्यांना वित्तीय सहाय्य देऊन या स्कॉलरशिपच्या माध्यमातून आम्ही हुशार मुलींसाठी क्षितीजाची निर्मिती करुन ‍विज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. सुरुवातीपासूनच ‘फॉर यंग विमेन इन सायन्स’ स्कॉलरशिप प्रोग्राम’ च्या अंतर्गत आम्ही विज्ञान क्षेत्रातील ४८५ मुलींना प्रगती करण्यात सहकार्य केले आहे. आंम्हाला आशा आहे की विज्ञान क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या तरुणींना प्रोत्साहन देऊ शकू आणि त्याच बरोबर त्यांचे भविष्य सुधारुन समाजाप्रती चांगले योगदान आम्ही देऊ शकू.”
पात्रतेचे निकष –
१२ वी पास (विज्ञान शाखा) झालेल्या केवळ महिला विद्यार्थीनी, शैक्षणिक वर्ष (२०२१-२२) मध्ये पीसीएम/पीसीबी/पीसीएमबी मध्ये किमान ८५ टक्के मार्क असलेल्या मुली अर्ज करु शकतात.
वर्ष २०२२-२३ साठी अर्जदाराने पदवीपूर्व (बॅचलर) कार्यक्रमासाठी विज्ञान क्षेत्राशी निगडीत विषयांत भारतातील मान्यताप्राप्त कॉलेज/विद्यापीठात अर्ज केलेला असावा.
अर्जदाराच्या संपूर्ण परिवाराचे वार्षक उत्पन्न हे रु ६ लाखांपेक्षा कमी असावे.

अर्ज कसा करावा –
अर्ज करु इच्छिणारे अर्जदार L’Oréal Scholarship या लिंक वर क्लिक करुन स्कॉलरशिप साठी अर्ज करु शकतात.
‍लिंक वर क्लिक केल्यानंतर अर्जदाराला त्यांचा ईमेल/मोबाईल/जीमेल अकाऊंटची नोंदणी करण्याची आवश्यकता आहे (या आधी अर्ज केला नसेल तर)
त्यानंतर अर्जदाराला लॉरियल इंडियाच्या ‘फॉर यंग विमेन इन सायन्स’ स्कॉलरशिप अर्जाच्या पेजवर नेण्यात येईल.
ऑनलाईन अर्जावरील गरजेचे रकाने पूर्ण भरा.
अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांना अपलोड करा.
‘नियम आणि अटी’ नीट वाचून त्या मान्य असल्याच्या परवानगीवर क्लिक करा आणि अर्ज पुढे दाखल करा.

आलेल्या अर्जांची तपासणी आणि निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदारांना टेलिफोन वरुन मुलाखत द्यायची आहे, त्यानंतर निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या पालकांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी यायचे आहे, या वेळी परिक्षकांमध्ये वैज्ञानिक, शिक्षणतज्ञ, आणि पत्रकार इत्यादींचा समावेश आहे. यावर्षी परिक्षकांची राऊंड ही हायब्रीड मोड मध्ये आहे. – यामध्ये अर्जदार हे वैयक्तिक पध्दतीत म्हणजेच मुंबई, नवी दिल्ली/एनसीआर, बंगळूरू, हैद्राबाद आणि कोलकाता येथे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकेल किंवा व्हर्च्युअल माध्यमातून मुलाखत देऊ शकेल.

अधिक माहितीसाठी अर्जदार ०११- ४३०-९२२४८ (विस्तार- ११७) (सोमवार ते शुक्रवार- स.१०.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत) संपर्क करु शकतात किंवा fywis- loreal@buddy4study.com या ईमेल वर संपर्क करु शकतात.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News