जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि पोलिसांच्या सहकार्याने जनजागृती अभियान राबविण्यात आले

Oct 17, 2022

नाशिक  : जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त माननीय पोलीस आयुक्त श्री जयंत नाईकनवरे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस उपायुक्त श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शना खाली अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल व नाशिक वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने शहरातील ट्रॅफिक सिग्नलवर रस्ते अपघातांबाबत जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी नाशिक चे सुप्रसिद्ध मेंदू व मणके विकार शस्त्रक्रिया तज्ञ म्हणाले की, रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. अतिवेग, हेल्मेट नसणे, सीट बेल्ट न लावणे अशा कारणांमुळे अनेकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागत आहे. ९० टक्के मृत्यू हे योग्य सुरक्षा मानकांच्या अभावामुळे होतात. प्रत्येकाचे जीवन खूप मौल्यवान आहे आणि आपण सर्वांनी योग्य सुरक्षा मानकांचे पालन करणे आणि इतरांना शिक्षित करणे आवश्यक आहे.
इमर्जन्सी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ.चंद्रकांत चव्हाण म्हणाले की, देशात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होत असल्याने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही या जागतिक ट्रॉमा दिनानिम्मित जनजागृती अभियान राबवत आहोत. आम्ही हा दिवस दुखापती आणि मृत्यू कमी करण्यासाठी तसेच देशभरात आणि जगभरातील वेदनादायक घटनांचे परिणाम कमी करण्यासाठी साजरा करतो. रस्ते अपघात हे जगभरात अत्यंत क्लेशकारक अनुभवांचे एक सामान्य कारण मानले जाते.
मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख उपस्थित समूहाचे मार्गदर्शन करताना म्हणाले कि , योग्य वैद्यकीय माहितीशिवाय, रुग्ण आपत्कालीन परिस्थितीत आमच्या विभागात येतात. आमची टीम तात्काळ उपचाराला प्राधान्य देते , तथापि, सर्व पैलूंमध्ये आघाताच्या तीव्रतेचे मूल्यांकन करणे आणि जीव वाचवण्यासाठी त्वरित चांगले उपचार प्रदान करणे हे एक जवाबदारीचे आणि आव्हानात्मक काम आहे .
या कार्यक्रमाला नाशिक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी ,मेंदू व मणके विकार शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.शेखर चिरमडे, सांधेबदल शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.प्रणित सोनवणे, स्रिरोग व प्रसुतीशास्र तज्ञ डॉ प्रणिता संघवी, केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर , व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे इतर वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News