कालिका देवी मंदिर ट्रस्ट तर्फे गरजू महिला आणि संस्थांना धान्य, साडी आणि ब्लँकेटचे वाटप

Nov 9, 2022

कालिका मंदिरचा हा स्तुत्य उपक्रम याची दखल इतर संस्थांनीही घ्यावी – मा. टी. एस. अकाली – सहा. धर्मादाय आयुक्त, नाशिक विभाग

नाशिक  : कालिका मंदिर देवी संस्थांनच्या वतीने नाशिकमधील गरजू महिलांना आणि गरजूसाठी कार्यरत असलेल्या संस्थांना धान्य, साडी आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रत्येकी १०० किलो तांदूळ, १०० किली गहू साडी आणि ब्लँकेट या वस्तूंचा समावेश होता. नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यामध्ये दहा दिवस ज्या महिलांनी अथक मेहनत घेवून प्रचंड गर्दीच्या वेळी हा नवरात्राचा महोत्सव आणि दसरा मेळावा सुरळीतपणे पार पडण्यामध्ये मोलाची भूमिका पार पडली अश्या महिला, सफाई कामगार गरजू महिला तसेच या गरजू महिला, निराधार आणि वृद्ध महिला यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था यांना  प्रमुख विशेष निमंत्रित आथिती नाशिक विभागाचे धर्मादाय आयुक्त मा. टी. एन. अकाली. नाशिक जिल्ह्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त राम लिफ्ते, दैनिक भ्रमरचे संस्थापक संपादक चंदूलाल शहा, मोहित नारंग यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करून त्यांना सन्मानित करण्यात आले. या संस्थांमध्ये गाडगे महाराज धर्मशाळा, रिमांड होम, अक्षय फौंडेशन, मदर तेरेसा प्रेमदान संस्था, प्रबोधिनी ट्रस्ट, पडसाद कर्ण-बधिर संस्था, वात्सल्य वृद्धाश्रम, आधार आश्रम संस्था, नाशिक या संस्थांच्या बरोबर १०२ गरजू महिला, सफाई कामगार यांचा समावेश होता.                                                                               या प्रसंगी कालिका मंदिर संस्थांनचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, खजिनदार सुभाष तळाजिया. सचिव डॉ. प्रतापराव कोठवळे, संचालक दत्ता पाटील, आबासाहेब कोठवळे, योगेश कोठवळे, संतोष कोठवळे, विशाल पवार, किशोर कोठवळे, दिलीपराज सोनार, राम पाटील, भरत पाटील, दीपा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी बोलतांना धर्मादाय आयुक्त टी. एन. अकाली यांनी सांगितले की कालिका मंदिर ट्रस्टचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कालिका देवी मंदिर ट्रस्टने अश्या गरजू महिलांची आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याची जाणीव ठेवून त्यांची दखल घेतली आणि अश्या प्रकारे मोलाची मदत दिली ही फार महत्वाची बाब आहे. अश्या कार्याची इतर सामाजिक संस्थानीही दखल घेऊन अश्या प्रकारे गरजूंना मदतीचा हात द्यावा असे नमूद केले.  यावेळी केशव अण्णा पाटील यांनी सांगितले की कालिका देवी मंदिरच्या वतीने धार्मिक उपक्रमाबरोबरच आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही गेली अनेक वर्षे वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहोत असे सांगितले आणि या उपक्रमामध्ये ज्या ज्या संस्थांनी मदत केली त्यां सर्वांचे आभार मानले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक दुधारे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News