वारंवार लघवीला जाणं हे प्रोस्टेटच्या आजाराचं लक्षण असू शकतं! लघवीची समस्या: सध्या वाढतेय; उद्यासाठी धोकादायक , सप्टेंबर हा प्रोस्टेट आरोग्य महिना

Aug 31, 2019

नाशिक : प्रोस्टेट ग्रंथींशी संबंधित आजार हा वयस्कर पुरुषांमध्ये आढळणारा महत्त्वपूर्ण आजार आहे. बहुतांश जण प्रोस्टेट होण्यासाठी सद्यस्थितीला काही जण वयाला, हवामानातल्या बदलाला, प्रवासामुळे येणाऱ्या ताणाला, वेगवेगळ्या ठिकाणंच पाणी पिण्याला इ. गोष्टींना कारणीभूत ठरवतात. तरीही, बैठ्या जीवनशैलीमुळे वय होण्याची सीमारेषा धूसर होत आहे. प्रोस्टेट मोठं झाल्यामुळे ‘लोअर युरिनरी ट्रॅक सिम्पटम्स’ दिसतात त्यामुळे तुमच्या जगण्याच्या दर्जालाही फटका बसू शकतो. जेव्हा प्रोस्टेट ग्रंथींमध्ये मायक्रोस्कोपिक एक्सेसिव्ह ग्रोथ होते त्यामुळे ग्रंथीची अतिरिक्त वाढ होते व ती नुसत्या डोळ्यांनी दिसून येते तेव्हा त्याला बेनियन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया(बीपीएच) असे म्हणतात. प्रोस्टेटच्या वाढीला वयाच्या तिशीच्या आधी सुरुवात होते. साधारणपणे 8 टक्के पुरुषांमध्ये वयाच्या चाळीशीपर्यंत मायक्रोस्कोपिक बीपीएचची लक्षणं दिसतात. 50 टक्के पुरुषांत ही लक्षणे साठीपर्यंत दिसून येतात आणि नव्वदीपर्यंत 90 टक्के पुरुषांत ही लक्षणे दिसतात.पन्नास किंवा त्याहून अधिक वय असलेल्या पुरुषांमध्ये बीपीएचचे प्रमाण 14 ते 30 टक्क्यांदरम्यान असते हे प्रमाणही त्याच्या व्याख्येवर अवलंबून असते. दरम्यान, भारतात 40 ते 49 वयोगटातील पुरुषांत 25 टक्के, 50 ते 59 वयोगटात 37 टक्के, 60 ते 69 वयोगटात 37 टक्के, तर 70 ते 79 वयोगटात 50 टक्के इतकी बीपीएचची व्याप्ती असते. अंदाजे पाचपैकी दर 2 भारतीय पुरुषांमध्ये बीपीएचमुळे लोअर युरिनरी ट्रॅकची लक्षणं त्रासदायक असल्याचे लक्षात येते. तरीही, बहुतांश जण डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेत नाहीत, तेवढेच लोक वयामुळे असं होतंच, हवामान बदलामुळे झालं असेल, प्रवासातल्या ताणामुळे होत असेल, पाण्यातल्या बदलामुळे झालं असेल अशी कारणं देऊन त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. जोपर्यंत हे दुखणं प्रचंड गंभीर स्वरूप धारण करत नाही आणि त्यात क्लिष्टता निर्माण होत नाही तोपर्यंत ते हे दुखणं अंगावर काढतात.

वयासोबत प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीचे दोन महत्त्वपूर्ण टप्पे असतात. पहिल्यांदा ऐन तारुण्यात प्रोस्टेट ग्रंथींचा आकार दुप्पट होतो. प्रोस्टेट ग्रंथींच्या विकासाचा दुसरा टप्पा साधारणपणे 25व्या वर्षी सुरू होतो आणि बहुतांश पुरुषांमध्ये त्यांच्या मृत्युपर्यंत ही वाढ होत असते. साधारणपणे वाढीच्या या दुसऱ्या टप्प्यातच बीपीएच होते. बीपीएच झालेले रुग्ण सामान्यपणे रात्री वारंवार लघवीला जायला लागते अशी तक्रार करतात त्याचबरोबर लघवी होण्यात अडचण होते किंवा मूत्राशय अर्धवटच रिकामं होतं अशाही तक्रारी करतात. प्रोस्टेट ग्रंथी मोठ्या झाल्यामुळे ‘लोअर युरिनरी ट्रॅक सिम्पटम्स’ दिसून येतात. त्यामुळे जीवनाच्या दर्जाला फटका बसतो. या लक्षणांशी जुळवून घेण्यासाठी रुग्ण पाणी आणि इतर द्रव पदार्थ घेणं टाळतो आणि त्याच्या लघवी करण्याबाबत चिंता करतो. उदाहरणार्थ, तो जिथं जातो तिथं मुतारी कुठे आहे ते शोधायला लागतो, बाहेरगावी दूर अंतराच्या प्रवासाला जाताना तो लघवीला जातो कारण एखाद्या लांबच्या बस प्रवासात कदाचित त्याला लघवीला जायला मिळणार नाही असं त्याला वाटतं. ही काळजी घ्यायला लागल्यामुळे रुग्णाचा जगण्याचा आणखी खालावतो.

केवळ तुमच्या प्रोस्टेट ग्रंथींच्या आकारावरूनच आजाराच्या लक्षणांचे गांभीर्य ठरते असे नाही ही महत्त्वाची बाबही लक्षात घ्यायला पाहिजे. काही पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथींची थोडीच वाढ झालेली असते पण त्यांच्यात आजाराची लक्षणे असू शकतात तसेच काही पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथींचा आकार बराच वाढलेला असतो पण त्यांच्यात आजाराची खूप किरकोळ लक्षणं दिसतात. जर त्यावर उपचार केले नाहीत तर या आजारामुळे मूत्रवहनाच्या मार्गत अडथळा निर्माण होतो आणि प्रोस्टेटच्या आरोग्यावर परिणाम होतो. या दुखण्याबद्दल लज्जा न बाळगता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या आजाराचा तुम्हाला किती त्रास होतोय, तुमचं वय काय आहे आणि तुमचं आरोग्य कसं आहे यानुसार डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम काळजी घेण्यासंबंधीच्या निवडीसाठी मदत करू शकतात. आणि ही महत्त्वाची गोष्ट पण ध्यानात घ्यायला हवी की बीपीएचची लक्षणं ही अत्यंत प्राणघातक प्रोस्टेटच्या कर्करोगाच्या लक्षणांसारखीही असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांकडे किंवा विशेषज्ञाकडे जाऊन तुमचा आजार किती गंभीर आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

याबद्दल अधिक माहिती देताना डॉ. प्रणव छाजेड,यूरोलॉजिस्ट, नेफ्रॉन्स किडनी केअर म्हणाले, ”हे रुग्ण त्यांचं घर, ऑफिस आणि घराजवळच्या ठिकाणांभोवती फिरत असतात. आठवडाभरात ऑफिसला जाणं आणि येणं याव्यतिरिक्त इतर ठिकाणी ते क्वचितच जातात. आठवडी सुटीच्या दिवशी ते घरी थांबतात किंवा घराजवळच्या ठिकाणी जातात. ते उघडपणे सांगत नाहीत त्यामुळे त्यांच्या वागण्यातून हे लक्षात येतं की ते फार दूर जाण्याचं टाळून आणि कायम बाथरूमला जाता येईल अशा ठिकाणी राहून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. ज्यांनी उपचार घेतलेले नाहीत अशा रुग्णांबाबत या गोष्टी खऱ्या आहेत. ज्यांनी उपचार घेतले आहेत त्यांची वागणूकही अशीच असते पण ते अधिक मोकळे असतात आणि जर लघवीला जायची गरज पडली तर या भावनेतून ते आत्मविश्वासाने बाहेर पडतात.”

शरीराच्या काही तपासण्या, रेडिओग्राफिक तपासण्या आणि काही लॅब चाचण्या यातून बीपीएचचे निदान केले जाते. शरीराच्या तपासण्यांमध्ये डीआरई (डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन) केले जाते, ज्यामध्ये युरोलॉजिस्ट स्वत: प्रोस्टेट ग्रंथींची तपासणी करतात. अबडॉमिनल आणि पेल्व्हिक अल्ट्रासाउंड चाचणीतूनही प्रोस्टेट ग्रंथींचा आकार मोजला जाऊ शकतो. लॅब चाचण्यांमध्ये पीएसए (प्रोस्टेट-स्पेसिफिक अँटिजेन) चाही समावेश होतो.

डॉ. प्रणव छाजेड, यूरोलॉजिस्ट, नेफ्रॉन्स किडनीकेअर यांच्या मतानुसार, ”या आजाराची व्याप्ती मोठी असूनही वयामुळे हा आजार होतो अशी समजूत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण याला आजार मानत नाहीत. रुग्णांमध्ये याबाबत जागृती करून यावर तोडगा काढला जाऊ शकतो. बीपीएच रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, आयपीएसएस स्कोअर कार्ड, अल्ट्रा साउंड आणि पीएसए चाचण्यांचा एकत्रित विचार करून बीपीएचचे निदान केले जाते.”

डॉ. प्रणव छाजेड, यूरोलॉजिस्ट, नेफ्रॉन्स किडनीकेअर पुढे म्हणाले, ”एकाएकी सारखं लघवीला जायला लागलं आणि हळूहळू न होता हे प्रमाण एकदमच वाढतं तेव्हा बहुतांश जणांना आजाराची जाणीव होते. वर्णन केलेल्या बहुतांश लक्षणांपैकी हे लक्षण सर्वांत पहिल्यांदा दिसून येते.”

सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या टॅम्सुलोसिन अल्फा-ब्लॉकर्सच्या सेवनाने बीपीएचचे नियमन केले जाते. बीपीएचची लक्षणं आयपीएसएस (इंटरनॅशनल प्रोस्टेट सिम्पटम स्कोअर)चा वापर करून तपासली जातात. जर लक्षणं नियंत्रणाबाहेर असतील तर एकत्रित उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो. औषधं देऊनही जर लक्षणांवर नियंत्रण मिळवता आले नाही तर शस्रक्रिया करून प्रोस्टॅटिक ग्रंथी काढल्या जातात. अल्फा ब्लॉकर्स ही खूप जुनी उपचार पद्धती आहे. त्या उपचारांसोबतच कॉमॉर्बिड रुग्ण, संभोगदृष्ट्या क्रियाशील रुग्ण आणि सामान्यजनांना वेगवेगळ्या रेणूंच्या माध्यमातून उपचार दिले जाऊ शकतात. बीपीएचच्या लक्षणांमुळे खूपच त्रास होईपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, पण तसे व्हायला नको.

सप्टेंबर महिना हा प्रोस्टेट आरोग्य महिना म्हणून पाळला गेला, या अंतर्गत पुरुषांच्या आरोग्याबाबत जागृती करण्यात आली. प्रोस्टेटच्या आरोग्याबद्दल माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी www.whatarelief.in येथे भेट देऊ शकता. रुग्णांमध्ये जागृती व्हावी तसेच त्याबद्दल शिक्षण दिले जावे यासाठी हे डिजिटल माध्यम विकसित करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News