एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये ‘हाफ मॅच’ बोनमॅरो ट्रान्‍सप्‍लांट यशस्‍वी

Nov 28, 2022

उत्तर महाराष्ट्रातील पहिले दुर्मिळ प्रत्‍यारोपण यशस्‍वी

नाशिक ः थॅलेसिमिया मेजर या वैद्यकीय स्‍थितीतील दहा वर्षीय बालकावर हाफ मॅच मच्चारजू प्रत्‍यारोपण (बोनमॅरो ट्रान्‍सप्‍लांट) येथील एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर येथे यशस्‍वी केले आहे. मुंबई वगळता उत्तर महाराष्ट्रासह राज्‍यात प्रथमच अशा स्‍वरुपाची यशस्‍वी प्रत्‍यारोपण करण्यात आले असल्‍याची माहिती एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व चीफ ऑफ सर्जिकल ऑन्‍कॉलॉजी अॅण्ड रोबोटिक सर्व्हीसेस प्रा. डॉ.राज नगरकर, रक्‍तविकार तज्‍ज्ञ डॉ.प्रियतेश द्विवेदी, डॉ.अंबर गर्ग यांनी पत्रकार परीषदेत दिली.
अधिक माहिती देतांना डॉ. राज नगरकर म्‍हणाले, थॅलेसिमिया या रक्‍तविकारग्रस्‍त बालकांच्‍या शरीरात रक्‍तनिर्मिती प्रक्रिया विस्‍खळीत झालेली असते. त्‍यामूळे त्‍यांना बाहेरुन रक्‍त द्यावे लागते. वारंवार ही प्रक्रिया राबवावी लागते. अशा बालकांच्‍या शरीरामध्ये अतिरिक्‍त लोह (आयर्न) साचत जाऊन कालांतराने त्‍याचे दुष्परीणाम जाणवू लागतात. तसेच आयुष्यभर बाहेरुन रक्‍तपुरवठा करणे आव्‍हानात्‍मक असते. अशा परीस्‍थितीत मज्‍जारज्‍जू प्रत्‍यारोपण (बोनमॅरो ट्रान्‍सप्‍लांट) हा एकमेव पर्याय बालकाच्‍या जीवनात आशेचा किरण ठरु शकतो. कुटुंबातील सदस्‍यांचे रक्‍तनमुने पूर्णपणे जुळल्‍यास (फुलमॅच) अशा बालकांवर सहज मज्‍जारज्‍जू प्रत्‍यारोपण (बोनमॅरो ट्रान्‍सप्‍लांट) करता येते. परंतु आई, वडिल किंवा भाऊ, बहिण, रक्‍तातील नातेवाईकांचे नमूने पन्नास टक्‍यांपर्यंत जुळत असेल (हाफ मॅच) तर प्रत्‍यारोपण करणे जोखीमीचे असते. दहा वर्षीय बालकाच्‍या बाबत हाफ मॅच असतांना त्‍याच्‍या वडिलांची इच्‍छाशक्‍ती व रुग्‍णालयातील तज्‍ज्ञ डॉक्‍टरांचा आत्‍मविश्‍वास यांच्‍या जोरावर गुंतागुंतीचे प्रत्‍यारोपण यशस्‍वी केले आहे.

अधिक माहिती देतांना डॉ.प्रियतेश द्विवेदी म्‍हणाले, हाफ मॅच या प्रकारात बोनमॅरो ट्रान्‍सप्‍लांट करतांना बालक दगावण्याची ५० टक्‍यांपर्यंत शक्‍यता असते. त्‍यामूळे ही उपचार पद्धती गुंतागुंतीची आहे. एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील सुसज्‍ज असे बोनमॅरो ट्रान्‍सप्‍लांट युनीट, व येथील प्रशिक्षित स्‍टाफ यांच्‍या सहकार्याने आम्‍ही प्रत्‍यारोपण (ट्रान्‍सप्‍लांट) यशस्‍वी करण्याचे आव्‍हान स्‍वीकारले. मुंबईनंतर राज्‍यात नाशिकमध्येच अशा स्‍वरुपाची यशस्‍वी प्रत्‍यारोपण करण्यात यश आलेले असून, बालकाला रुग्‍णालयातून डिसचार्ज देण्यात येत आहे. विशेष म्‍हणजे अत्‍यंत कमी खर्चात बोनमॅनो ट्रान्‍सप्‍लांट करण्यात आले आहे. या यशस्‍वी प्रत्‍यारोपणामुळे अशा प्रकारच्‍या अनेक थॅलेसिमियाग्रस्‍त बालकांना दिलासा मिळणार आहे. थॅलेसिमिया मेजर स्‍वरुपाच्‍या बालकांच्‍या पालकांनी आवश्‍यक चाचण्या करुन घेतांना मज्‍जारज्‍जू प्रत्‍यारोपण करत बालकांना दिलासा द्यावा, असे आवाहन त्‍यांनी केले.
डॉ.अंबर गर्ग म्‍हणाले, बाहेरुन रक्‍त दिल्‍याने उद्भवणार्या संभाव्‍य समस्‍यांवर यशस्‍वी उपचार करत बालकांना जीवनाची नवी दिशा उपलब्‍ध करुन देता येऊ शकते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसोबत अन्‍य शासकीय योजनांचा आधार बोनमॅरो ट्रान्‍सप्‍लांटसाठी मिळू शकतो. अधिक माहितीसाठी एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरशी संपर्क साधण्याचे आवाहन त्‍यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News