२४ तासात शिष्यवृत्ती आणि जातपडताळणी प्रमाणपत्र मिळणार – सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे

Sep 1, 2019

 

मुंबई, दि. ३१ : शिष्यवृत्ती आणि जातपडताळणी प्रमाणपत्र हे महत्त्वाचे दस्तऐवज असल्यानेअवघ्या २४ तासात दोन्ही प्रमाणपत्र मिळवून देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ. खाडे यांनी दिली.

  शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी समाज कल्याण विभागाचे अधिकारी स्वतः महाविद्यालयात जाऊन वैयक्तिक पातळीवर मदत करतात मात्र  शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाशी सम्पर्क साधल्यास या विद्यार्थ्यांना अवघ्या २४ तासात जातपडताळणी आणि शिष्यवृत्ती प्रमाण पत्र मिळवून देण्यात येईल.

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक देशाची संपत्ती असल्यामुळे यांचे हक्क मिळवून देण्यास विभाग प्रयत्नशील आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना विसावण्यासाठी विरंगुळा केंद्र बांधले,अपंगांनी जिल्हा निहाय नोंद केल्यास त्यांचे हक्क मिळून दिले जातील तसेच उद्योग, व्यवसाय आणि शिक्षणातला वेळ वाचविण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मागासवर्गीय प्रवर्गासाठी स्मार्टकार्ड कार्ड दिले जातील. हे स्मार्ट कार्ड अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी फायदेशीर ठरतील असा विश्वास श्री. खाडे यांनी व्यक्त केला.

  सामाजिक न्याय विभाग प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी १०० खाटांचे दोन मुलींचे व मुलांचे वसतिगृह बांधणार असून वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. भाडे तत्त्वावरील वसतिगृह बंद  केले जातील,मागासवर्गीय घटकातील नवउद्योजकांना सामाजिक न्याय विभागाकडून प्रशिक्षण  दिले जाणार आहे.

  मातंग समाजातील प्रत्येकाला आश्रय असावा, हक्काचे घर असावे यासाठी घरकुल योजनेंतर्गत सव्वालाख घरकुल बांधण्यात आले आहेत. या समाजातील कलाकारांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यास सामाजिक न्याय विभागातर्फे प्रयत्न  केले जातील.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News