आय.ए.एम.कडून ‘ किंग आणि बादशाहा ‘ स्पर्धेचे आयोजन

Dec 15, 2022

रुबाबदार व्यक्तीमत्वाची होणार निवड !

नाशिक :बाईचं सौंदर्य आणि पुरुषाचं कर्तुत्व पहाव असं म्हणतात. पण कालानुरूप दोन्ही संकल्पना आता बदलल्या, लिंग समानता केवळ कल्पनेत नाही तर प्रत्यक्षात उतरते आहे., मग या काल प्रवासात स्त्रियांच्या कर्तृत्वाला आणि पुरूषांच्या सौंदर्यालाही महत्व आले नाही तर नवलच. रूबाबदार पुरुष केवळ त्याच्या व्यक्तिमत्वाची नाही तर कामाची छाप तेवढीच सोडून जातो, आणि अशाच काही
रूबाबदार व्यक्तिमत्वाची पारख करण्यासाठी आयएएमने यावर्षी अयोजित केली आहे आयएमए ‘किंग आणि बादशहा’ स्पर्धा. डॉक्टर मंडळी केवळ बृद्धिमतेने नाही तर आपल्या देखण्या व्यक्तीमत्वाने व रुबाबदार चालीने आपल्या सर्वाचे मन मोहुन घेणार आहेत. चटपट्या, हजरजबाबी आणि आपल्या गुणांचे परिक्षण करण्यासाठी काही खास प्रश्नांनाही सामोरे तसेच ‘लव यु जिंदगी’ या वार्षिक स्नेहसंमेलन यात आयएमए डॉक्टरचे नृत्य व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे अयोजन रविवार १८ डिसेंबर 2022रोजी सायं 5.30 वा. केले आहे.

कार्यकमाच्या यशस्वितेसाठी डॉ. गीतांजली गोंदकर, डॉ. कविता गाडेकर, डॉ. पंकज भदाने, डॉ. श्रिया कुलकर्णी, डॉ. किरण शिंदे, डॉ. मिलिंद भराडिया, डॉ. मीनल रणदिवे, डॉ. माधवी मुठाळ गोरे प्रयत्न करत आहेत.
यावेळी. डॉ. मनिषा जगताप, डॉ. प्रेरणा शिंदे, डॉ. शलाका बागुल, डॉ. दिलेश भारंबे, डॉ. सागर भालेराव उपस्थित होते. नंदनवन लॉन्स, सावरकर नगर, नाशिक येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वांनी सहकुटूंब उपस्थित राहवे असे आवाहन आय एम ए चे अध्यक्ष डॉ. राजश्री पाटील व सचिव डॉ. विशाल पवार यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News