नाशिक : सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक विभागासाठी नाशिक जिल्ह्यातील रहदारी सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या वतीने ट्रॅफिक बॅरिगेट्स हस्तांतरित सोहळ्याचे आयोजन दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४ :०० वाजता अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे करण्यात आले होते . हा सोहळा माननीय श्री शहाजी उमप ( पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला , या प्रसंगी उपस्थित समूहास संबोधित करताना म्हणाले कि, ट्रॅफिक बॅरिगेट्स मुळे नाशिक जिल्यातील वाहतुकीचे नियोजन करत असताना, वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास निश्चितच मदत होणार आहे. या हस्तांतर सोहळ्यास मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख ,केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे डॉक्टर , पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ
नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...






