‘वडापाव’ ठरला नाशिककरांचा आवडतीचा मेनू ; स्वीगीवर सर्वांधिक ऑर्डरची नोंद

Dec 21, 2022

नाशिक : मिनी महाराष्ट्र अशी ओळख असणाऱ्या नाशिक शहरात यंदा हजारो नव्या वापरकर्त्यांचे स्वागत करत स्वीगीने लोकप्रियतेची नवी शिखरे सर केली आहेत. स्वीगी फूड मार्केटप्लेसवर नाशिक आणि महाराष्ट्रातील लोकांना काय खायला आवडते

● नाशिकमध्ये वडापावची ऑर्डर सर्वाधिक प्रमाणात केली गेली, तर महाराष्ट्रभर बिर्याणी अव्वल ठरली

● महाराष्ट्रात नाश्त्याच्या पदार्थांमध्ये समोसा अव्वल क्रमांकावर आहे, नाशिकमध्ये वडापाव, कचोरी, मंच्युरियन पॅटिस आणि छोटे भटुरे हे लोकप्रिय पदार्थ आहेत

● नाशिकमध्ये रसमलाई हे सर्वाधिक ऑर्डर केले गेलेले मिष्टान्न आहे तर महाराष्ट्रात स्पेशल फालुदा ही लोकप्रिय डिश

ग्राहक-प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे आणि आम्हाला या स्थानावर पोहोचवण्यात प्रत्येक ऑर्डरचा हातभार लागला आहे. भारतीय पदार्थ आणि स्थानिक पातळीवर लोकप्रिय पदार्थांची या वर्षभरात प्रचंड मागणी होती. नाशिकमध्ये तब्बल १५३०३ रु.ची एक ऑर्डर करण्यात आली! डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हस -आमचे डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह आकाश राठोड यांनी नाशिकमध्ये तब्बल ५५९७ इतक्या ऑर्डर्स पोहोचवल्या!
स्वीगीवरील भागीदार रेस्तराँ-२०२२ मध्ये नाशिकमधील ५८३ हून अधिक रेस्तराँ स्वीगीसोबत जोडले गेले. स्वीगीसोबतच्या भागीदारीमुळे नाशिक आणि महाराष्ट्राच्या विविध भागांमधील सुमारे १६२५५ सक्रिय रेस्तराँ आणि खाद्यपदार्थांच्या ठिकाणांना आपला व्यवसाय वृद्धिंगत करता आला.इनायत कॅफे चे मालक शादाब फल्लाह यांचा हा कौटुंबिक, पिढ्यान् पिढ्यांचा व्यवसाय नाशिकमध्ये मागील ६० वर्षांपासून लोकप्रिय आहे. ते म्हणाले, “स्वीगीमुळे आम्ही ज्या प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचलो ते त्याआधी कधीच घडले नव्हते. खूप दूरवरच्या ग्राहकांनाही या रेस्तराँबद्दल कळले आणि आमच्या ऑर्डर्स वाढल्या. स्वीगीच्या सेल्स मॅनेजरसोबत काम केल्याने ऑनलाइन काम कसे चालते आणि आमच्यासाठी अधिक हितकारक काय असेल हे समजून घेण्यात मदत झाली.”
स्वीगी अॅपवर तुमच्यासाठी लवकरच येत आहे – २०२२ मध्ये तुम्ही आणि तुमच्या शहराने स्वीगिड कसे केले याबद्दलच्या धमाल प्रश्नमंजुषेसाठी तयार रहा !

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

“संविधान विचार जागर ” स्पर्धा परीक्षा २०२५ ची घोषणा ; स्पर्धकांसाठी तीन गट ,गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला

नाशिक : विविध धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये...

read more
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले  संगणक दान

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडने आदिवासी शाळांना दिले संगणक दान

नाशिक – ग्रामीण शिक्षणातील डिजिटल दरी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ईएसडीएस...

read more
Breaking News