प्लास्टिक सर्जरी जनजागृतीस्तव भिंती चित्राच्या प्रदर्शनाचे आयोजन

Dec 22, 2022

सुप्रसिध्द प्लास्टिक सर्जर व लेखक डॉ.रविन थत्ते यांचे चर्चासत्र

नाशिक : आजच्या या आधुनिकतेच्या आणि धावपळीच्या विश्वात आपण सर्वच आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतो आणि त्याचबरोबर विविध वैद्यकीय शाखेंच्या बाबतीत अद्यावत माहिती ठेवतो. मात्र, प्रचंड प्रमाणात प्रगति होऊनही ‘प्लास्टिक सर्जरी’ या वैद्यकीय शाखेबद्दल सामान्य जनमाणसातच नाही तर वैद्यकीय क्षेत्रातिल काही व्यक्तींना सुद्धा मर्यादित माहिती असल्याचे आढळून येते. प्लास्टिक सर्जन नक्की काय करतात? याबद्दल अनेकांच्या मनात औत्सुक्य आहे. यासर्व बाबींचा विचार करून प्लास्टिक सर्जन्स असोसिएशन ऑफ नाशिक, नाशिक सर्जिकल सोसायटी आणि आयएमए नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि.२४) शालिमार येथील आयएमए येथे भिंती चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून या प्रदर्शनात प्लास्टिक सर्जरी या विषयाचे अनेक पैलु उलगडले जाणार आहेत. त्याचबरोबर या सर्जरीबाबत मनात असलेली कुतुहलता तसेच असंख्य प्रश्नांचे उत्तरेही शोधता येणार आहेत. या प्रदर्शनात प्लास्टिक सर्जरी या विषयाबद्दल निर्मित केलेल्या काही ध्वनिचित्रफितही बघावयास मिळणार आहेत. एवढेच नव्हे तर नागरिकांच्या मनात असलेल्या रास्त शकांचे निरसन करण्यासाठी त्या दिवशी पूर्ण वेळ प्लास्टिक सर्जन्स उपस्थित असणार आहेत. ‘प्लास्टिक सर्जरी’ हि एक अशी वैद्यकीय शाखा आहे जी एका कुठल्याही अवयव संस्थेपूरती मर्यादित नसून, ती एखाद्या विशिष्ठ कार्यपद्धती ऐवजी तत्वांवर आधारित आहे. शरीरातील विविध अवयव, तेथील त्वचा, हाडे, रक्तवाहिन्या, मज्जासंस्था व मज्जारज्जू यांना जोडण्याचे व त्यांचे पुनःनिर्माण करण्याचे कार्य प्रामुख्याने प्लास्टिक सर्जरी या शास्त्रात केले जाते. भारताचे आणि प्लास्टिक सर्जरीचे नाते फार जुने आहे. आचार्य सुश्रृत यांना प्लास्टिक सर्जरीचे जनक म्हणतात. प्लास्टिक सर्जरी ही मूलभूत तत्त्वांवर आधारित वैद्यकीय शाखा असून त्याचे स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे. मूत्रपिंड, हृदय, मेंदू अशा विविध अवयवांचे तज्ज्ञ डॉक्टर असतात. मात्र, प्लास्टिक सर्जन नखापासून ते केसांपर्यंत शरीराच्या सगळ्याच अवयवांशी निगडीत विकृतीवर कार्य करतात. प्लास्टिक सर्जनच्या या भूमिकेमुळे त्यास रेस्न्यू सर्जन असेही म्हणतात.
प्लास्टिक सर्जनचे काम कसे चालते, त्यांच्या माध्यमातून प्लास्टिक सर्जरी कशी केली जाते? या व अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहेत. तरी या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाला अधिकाधिक नाशिककरांनी भेट देवून आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यावीत, असे आवाहन प्लास्टिक सर्जन्स असोसिएशन ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र नेहेते, उपाध्यक्ष डॉ. दयानंद तसेच सचिव आणि खजिनदार डॉ. किरण नेरकर, नाशिक सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शिल्पा दयानंद, सचिव डॉ. संतोष रावलानी, डॉ. आयएमएचे सचिव डॉ. विशाल पवार यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News