रुग्‍णांची अस्‍मिता टिकविण्यासह क्षमता वाढीसाठी प्‍लॅस्‍टिक सर्जरी उपयुक्‍त

Dec 26, 2022

*डॉ.थत्ते – प्‍लॅस्‍टिक सर्जरीविषयासंदर्भात केले विस्तृत मार्गदर्शन*

नाशिक : व्‍यक्‍तींच्‍या रोमरोमात अस्‍मिता पसरलेली असते. त्‍यामूळे सुघटन शल्‍य (प्‍लॅस्‍टिक सर्जरी) हे शास्‍त्र अस्‍मितेशी निगडित आहे. रुग्‍णांची अस्‍मिता टिकविण्यासह त्‍यांच्‍या क्षमता वाढीसाठी हे शास्‍त्र उपयुक्‍त ठरत असल्‍याचे प्रतिपादन प्रसिद्ध प्‍लॅस्‍टिक सर्जन डॉ. रविन थत्ते यांनी शनिवारी (दि.२४) व्‍यक्‍त केले.

प्लास्टिक सर्जन्स असोसिएशन ऑफ नाशिक, नाशिक सर्जिकल सोसायटी आणि आयएमए नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शालिमार भागातील आयएमए सभागृहात आयोजित मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ.सुधिर संकलेचा यांनी मुलाखत घेतली. याप्रसंगी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्‍लास्‍टिक सर्जन डॉ.पराग सहस्‍त्रबुद्धे, नायर मेडिकल कॉलेजचे प्‍लास्‍टिक सर्जरी विभाग प्रमुख डॉ. उदय भट, आयएमए नाशिक शाखेच्‍या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, प्लास्टिक सर्जन्स असोसिएशन ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र नेहेते, उपाध्यक्ष डॉ. दयानंद तसेच सचिव आणि खजिनदार डॉ. किरण नेरकर, नाशिक सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शिल्पा दयानंद आदी उपस्‍थित होते.
डॉ.थत्ते म्‍हणाले, ग्रीक भाषेतून प्‍लॅस्‍टिक सर्जरी हा शब्‍द पुढे प्रचलित झाला. परंतु सुघटनशास्‍त्र हा त्‍यापेक्षाही व्‍यापक शब्‍द संस्‍कृत भाषेत नमूद केलेला आहे. सुमारे सहाशे वर्षांपूर्वी आरोपींना नाक कापण्याची शिक्षा दिली जायची. यावेळी शस्‍त्रक्रियेची पद्धती विकसीत करण्यात आलेली होती. आज बाह्य तसेच अंतर्गत अशा सर्व शाखांतील निष्णात शल्‍यचिकित्‍सकांकडून त्‍यांच्‍या शस्‍त्रक्रियेदरम्‍यान प्‍लॅस्‍टिक सर्जनची मदत घेतली जात असून यातून या क्षेत्राची व्‍याप्ती अधोरेखीत होते.
डॉ.सहस्‍त्रबुद्धे म्‍हणाले, प्‍लॅस्‍टिक सर्जरीबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. यासंदर्भात कोल्‍हापूर येथे झालेल्‍या राज्‍यस्‍तरीय परीषदेत झालेल्‍या चर्चेतून जनजागृतीची संकल्‍पना पुढे आली. त्‍यानुसार सोलापूर, नांदेडनंतर राज्‍यात तिसरा कार्यक्रम नाशिकला होतो आहे. रुपात्‍मक, सोबत गुणात्‍मक बदलासाठी हे शास्‍त्र उपयुक्‍त ठरते आहे. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ.राजेंद्र नेहेते यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शिल्पा दयानंद यांनी केले.

*प्रदर्शनातून जनजागृती*
‘प्लास्टिक सर्जरी’ या वैद्यकीय शाखेबद्दल सर्वसामान्‍यांमध्ये जनजागृती करण्यासाठी भिंती चित्र प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन आयएमए अध्यक्षा डॉ.राजश्री पाटील यांनी केले. प्रदर्शनात प्लास्टिक सर्जरी विषयाचे अनेक पैलु उलगडण्यात आले. नाशिकमधील निष्णात शल्‍यचिकित्‍सकांनी केलेल्‍या शस्‍त्रक्रिया व त्‍यांचे परीणाम या प्रदर्शनातून मांडण्यात आले होते

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News