येत्या ४ व ५ फेब्रुवारी २३ रोजी नि:शुल्क साधना शिकायची नामी संधी
नाशिक : महर्षि सदाफलदेव विहंगम योग संस्थान, नाशिक प्रचार शाखेच्या वतीने १००१ कुण्डिय विश्व-शांती वैदिक महायज्ञ आणि विहंगम योग संत समागम ४ आणि ५ फेब्रुवारीला त्र्यंबकरोड जवळील ठक्कर डोम येथे हा अध्यात्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. विहंगम योगाचे वर्तमान सद्गुरु श्री. स्वतंत्रदेवजी महाराज यांच्या मार्गदर्शनाचा लाभ उपस्थित भाविकांना होणार आहे. यानिमित्त विहंगम योगाची साधना निःशुल्क शिकविली जाणार असल्याची माहिती सद्गुरु सदाफल देव विहंगम योग संस्थानचे राष्ट्रीय संत श्री किशनलाल शर्मा, प्रमुख आयोजक योगेश पाटील (गडाख), विवेक पाटील (गडाख), जयंत होनराव यांनी दिली आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देतांना विवेक पाटील म्हणाले, ” येत्या ४ फेब्रुवारीला सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत सुपूज्य संतप्रवरजींची दिव्य वाणी आणि श्री सद्गुरुदेवजींच्या अमृतवाणीचा लाभ उपस्थित भाविकांना घेता येणार आहे. यावेळी विहंगम योगाची साधना निःशुल्क शिकविली जाणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ५ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत १००१ कुण्डिय विश्वशांती वैदिक महायज्ञ आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.”
योगेश पाटील म्हणाले, ” विहंगम योग साधनेचे शारीरीक, मानसिक व आध्यात्मिक लाभ लाखो भाविकांना होत आहेत. नेत्रदोष दूर होण्यासह अनिद्रेपासून मुक्ती, रक्तदाब, मधुमेह व अन्य रोगांवर कायम स्वरुपी नियंत्रण, रोग प्रतिकार शक्ती तसेच ऊर्जा यांमध्ये विलक्षण वृद्धी होते. सध्या मानसिक व्याधींचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. अशात तणाव कमी होण्यासह कार्यक्षमता तसेच निर्णयक्षमतेत विलक्षण वाढ होण्यास अनेकांना मदत झालेली आहे. विशेष आंतरिक शांतीची अनुभूती भाविकांना मिळते आहे. वैदिक हवन यज्ञाचेही अनेक लाभ आहेत. यामध्ये भौतिक कामनांची पूर्ती, वायुमंडल शुद्धी , पर्जन्यमानात वाढ , ओझोनचा थर वाढण्यास मदत , शरीर निरोगी होणे, समाजात एकता व परस्पर प्रेमाची भावना दृढ होणे, मनातील कलुषित भावना व कुप्रवृत्तिंचे दमन, स्वार्थ, त्याग तसेच परोपकाराची भावना दृढ होते.”
या कार्यक्रमादरम्यान विविध ठिकाणांहून भाविक वर्ग येणार असून, नाशिकच्या भाविकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






