५० रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी ; मेडिकव्हर हॉस्पिटलची कामगिरी

Feb 1, 2023

नाशिक : नाशिक मधील मेडिकव्हर हॉस्पिटल मध्‍ये एका वर्षात ५०० जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाल्याची माहिती डॉ. प्रणित सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, “नोव्हेंबर २०२२ मध्ये मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोटिक अत्याधुनिक यंत्राचा समावेश करण्‍यात आला. ज्याला रुग्णांनी चांगला प्रतिसाद देत आज जवळजवळ एका वर्षात ५० रुग्णांवर रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करुन ते यशस्वी झाली असून रुग्ण साधारण आयुष्य जगत आहे.”
याबाबत अधिक माहिती देत ते पुढे म्हणाले की, रोबोटिक गुडघा बदलण्यात सामान्यत: खालील गोष्टींचा समावेश होतो इन-क्लिनिक निदान,सीटी-स्कॅन
शस्त्रक्रियापूर्व नियोजन (व्हर्च्युअलसिम्युलेशन),स्वायत्त रोबोटिक सर्जिकल प्रक्रिया,हॉस्पिटलमधून लवकरडिस्चार्ज,पारंपारिक मॅन्युअल सर्जिकल प्रक्रियेच्या तुलनेत, रोबोटिक गुडघा बदलण्याचे बरेच फायदे आहेत रोबोटिक गुडघा बदलण्याचे
चांगले इम्प्लांट पोझिशनिंग, अचूक शस्त्रक्रिया हाड कापणे, कमीत कमी मानवी हस्तक्षेप, जलद पुनर्प्राप्ती आणि कमीत कमी हॉस्पिटलमध्ये राहणे असे बरेच फायदे आहे.

मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशू व बालरोग तज्ञ डॉ. सुशील पारख म्हणाले की, ” वैद्यकीय क्षेत्रासाठी हि उल्लेखनीय बाब तर आहेच परंतु संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी हि अत्याधुनिक सुविधा आरोग्यदायी आहे. सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (TKR) आता नव्या युगाकडे वाटचाल करत आहे. शस्त्रक्रियेतील साहित्य, उपकरणे आणि तंत्रांमध्ये बर्‍याच सुधारणांमुळे या प्रक्रियेची परिणामकारकता खूप वाढली आहे. अचूक इम्प्लांट पोझिशनिंग आणि अलाइनमेंटच्या आव्हानांवर मात करण्यासाठी, नाविन्यपूर्णतेची सतत गरज भासत असते. संगणकाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया नवोपक्रमाचा एक नवीन टप्पा सुरू झालेला आहे आणि जर आपण अलीकडील ट्रेंड आणि प्रगती तंत्रज्ञानाबद्दल बोलायचे झाल्यास , रोबोटिक्सने वर्तमान आणि भविष्यासाठी नवा मार्ग दाखवला आहे. गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियांसाठी जगातील पहिला ( CUVIS) हा स्वायत्त रोबोट आहे . अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाविन्यपूर्ण आणि कार्यक्षम सेवांद्वारे प्रगत वैद्यकीय सेवेसाठी वचनबद्ध आहेच परंतु या अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या साह्याने परिणामकारक उपचार आता रुग्णांवर होत आहेत. ”
या वेळी मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु व बालरोग तज्ञ् डॉ सुशील पारख , सांधे विकार व सांधेप्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ञ्, डॉ प्रणित सोनावणे , डॉ बाबुलाल अग्रवाल, डॉ चंद्रकांत चव्हाण , डॉ स्नेहल धात्रक , डॉ रोहन देव , मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर हे मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. या प्रसंगी रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News