17 वी महाराष्ट्र राज्य डाटबेटिस असोसिएशनची राज्य परिषद नाशिकमध्ये

Feb 2, 2023

राज्यभरातून ९०० हून अधिक मधुमेह तज्ञांचा सहभाग

नाशिक : महाराष्ट्र राज्य डायबेटीस असोसिएशनची सतरावी राज्य परिषद दि.३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान नाशिकमध्ये हॉटेल एमराल्ड पार्क येथे होत असून या परिषदेसाठी राज्यभरातून सुमारे ९०० हून अधिक मधुमेह तज्ञ सहभागी होणार असून मधुमेहावर नवनवीन उपचार पध्दती तसेच संशोधन याविषयी या परिषदेत उहापोह केला जाणार असल्याची माहिती मधुमेह तज्ञ व परिषद समितीचे चेअरमन डॉ. नारायण देवगांवकर,डॉ. समीर चंद्रात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परिषदेच्या पहिल्या दिवशी ३ फेब्रुवारी २०२३ रोजी मधुमेहावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून यामध्ये अनेक तज्ञ मार्गदर्शक मधुमेहाच्या विविध पैलुंवर मार्गदर्शन करतील. ४ फेब्रुवारी दुपारी १२:३० वाजता परिषदेचा उद्घाटन समारंभ होणार असून यामध्ये आरोग्य, शिक्षण व संशोधन मुंबई संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर उद्घाटन म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.डॉ. राहुल आहेर तसेच आंतरराष्ट्रीय मधुमेह असोसिएशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. शशांक जोशी, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राकेश सहाय यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शुक्रवार दि. ३ फेब्रुवारी होणार्‍या कार्यशाळेत पुणे येथील डॉ. ए.जी.उन्नीकृष्णन हे रूग्णाची रक्तशर्करा कमी जास्त झाल्यास काय करावे याविषयी मार्गदर्शन करतील. मुंबई येथील डॉ. शैला शेख या मधुमेही रूग्णाची स्थुलता निवारण या विषयावर मार्गदर्शन करणार असून पुणे येथील डॉ. संजय अग्रवाल मधुमेही रूग्णांची शस्त्रक्रियेदरम्यान घ्यावयाची दक्षता याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
शनिवार दि.४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील डॉ. विजय पणीवर हे मधुमेहात औषधोपचारांचे महत्व व नव्या उपचार पध्दती याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पद्मश्री डॉ. शशांक जोशी कृत्रिम बौध्दिक क्षमता याविषयी बोलतील. तसेच हृदयविकार व मधुमेह याविषयावर डॉ. नारायण देवगांवकर मार्गदर्शन करणार असून डॉ. पार्थ देवगांवकर पद्व्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रश्‍नमंजुषा घेणार आहेत.
रविवार दि.५ फेब्रुवारी रोजी परिषदेच्या समारोपाला अहमदाबाद येथील डॉ. बन्सी साबू, मुंबई येथील डॉ. अमीत गुप्ता, डॉ. एच.बी.चंडालिया हे विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत मधुमेहावर प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.
या परिषदेच्या सायंटीफीक प्रोग्रॅमसाठी डॉ. यशपाल गोगटे व डॉ. नारायण देवगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या पत्रकार परिषदेसाठी डॉ. नारायण देवगावकर, डॉ. समीर चंद्रात्रे, डॉ. समीर पखाले, डॉ.अरुण महाले, डॉ.दिपेंद्र चौधरी,डॉ.विनोद चौधरी,डॉ. दिनेश देसले, डॉ.प्रितम अहिरराव, डॉ. भुषण देवरे, डॉ. यशपाल गोगटे, डॉ. समीर शहा, डॉ. राजश्री पाटील, डॉ. मृणालिनी केळकर, डॉ. राहुल पाटील, डॉ. विजय धोंडगे, डॉ. समीर पेखळे, डॉ. पार्थ देवगावकर उपस्थित होते.

 

मधुमेहाबद्दल सर्वकाही ऐका तज्ञांकडून नाशिककरांनी विशेष उपक्रमाचे आयोजन

मधुमेहाबद्दल अनेक समज-गैरसमज रूग्णांच्या मनात असतात यासाठी शुक्रवार दि.३ फेब्रुवारी २०२३ रोजी, सायंकाळी ६ वाजता, शंकराचार्य न्यास,कुर्तकोटी सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे मुंबई येथील प्रसिध्द मधुमेह तज्ञ डॉ. विजय पणिकर, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, नाशिक येथील डॉ. नारायण देवगावकर, ठाणे येथील आहारतज्ञ डॉ. रश्मी मधोळकर सेठी मार्गदर्शन करणार असून त्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. समीर चंद्रात्रे करणार असल्याची माहिती आयोजन समिती अध्यक्ष डॉ. नारायण देवगावकर, सदस्य डॉ.समीर चंद्रात्रे यांनी दिली.

बेसिक लाईफ सपोर्ट वर्कशॉप

एखाद्या व्यक्तीला अचानक श्‍वास घेण्यास अडचण येत असेल किंवा हृदयविकाराचा झटका आला असेल तर बेसिक लाईफ सपोर्टद्वारे रूग्णाला श्‍वास घेण्यासाठी मदत करू शकतो यासाठी शनिवार दि.४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७:३० ते ८:३० गोल्फ क्लब मैदान, त्र्यंबकरोड,नाशिक येथे बेसिक लाईफ सपोर्ट वर्कशॉपचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News