४ फेब्रुवारी रोजी सायक्लोथॉन २०२३ रॅलीचे आयोजन

Feb 2, 2023

नाशिक – जागतिक कर्करोग दिनानिमित्त शनिवार ४ फेब्रुवारी अपेक्स वेलनेस हॉस्पिटलकडून सायक्लोथॉन २०२३ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्ष २०२३ मध्ये जागतिक तज्ज्ञांकडून असा अंदाज वर्तवला जातो की सुमारे एक कोटी तीस लाख पेक्षा जास्त लोक कर्करोगामुळे आपला जीव गमावतील. ही संख्या एड्स, मलेरिया आणि क्षयरोग हे तीनही आजार मिळून होणाऱ्या संख्येपेक्षा जास्त आहेत. याच पार्श्वभूमीवर जागतिक कर्करोग दिनी ॲपेक्स वेलनेस हॉस्पिटल गोविंद नगर आणि ”नाशिक सायक्ललिस्ट फाउंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने “राईड टू बीट कॅन्सर” या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे
शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ६.३० वा ॲपेक्स वेलनेस हॉस्पिटल गोविंद नगर नाशिक येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. या वेळी कॅन्सर तपासणी आणि योग्य वेळी उपचारांचे महत्त्व यावर जनजागृती केली जाणार आहे. सोबत झुंबा नृत्य योगासन, वैद्यकीय क्षेत्रात काम करून आणि विविध क्रीडा प्रकारात विशेष कामगिरी केलेले डॉक्टर सहभागी होऊन उत्तम आरोग्याचे महत्त्व विशद करणार आहेत. कार्यक्रमात इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक, पंचवटी डॉक्टर असोसिएशन, निमा न्यू नाशिक, सातपूर अंबड डॉक्टर असोसिएशन, फॅमिली फिजिशियन असोसिएशन सहभागी होणार आहेत.
सदर रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने डॉ. शैलेश बोंदर्डे डॉ. नितीन बोरसे आणि नाशिक सायक्ललिस्ट फाउंडेशन अध्यक्ष किशोर माने आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News