७५ बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांट यशस्‍वी ; डॉ. प्रितेश जुनागडेची यशदायी कामगिरी

Feb 3, 2023

१८ महिन्‍याच्‍या बालकापासून ६८ वर्षीय वृद्ध रुग्‍णावर यशस्‍वी उपचार

नाशिक : गंगापूर रोडवरील लोटस हॉस्‍पिटलच्‍या माध्यमातून गेल्‍या बारा वर्षांपासून रुग्‍णसेवेचे व्रत जोपासले जाते आहे. प्रसिद्ध रक्‍तविकार तज्‍ज्ञ डॉ.प्रितेश जुनागडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली विक्रमी ७५ बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांट (मज्‍जारज्‍जू प्रत्‍यारोपण) यशस्‍वी करण्यात आलेले आहे. मुंबई, पुणे वगळता महाराष्ट्रात इतक्‍या मोठ्या प्रमाणात बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांट करणारे लोटस हे एकमेव रुग्‍णालय ठरले आहे. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी डॉ. जुनागडे यांनी संवाद साधला.

आजवरच्‍या थक्क करणार्या प्रवासाविषयी डॉ.प्रितेश जुनागडे पत्रकार परिषदेत म्‍हणाले, रुग्‍णसेवेसाठी आम्‍ही सदैव तत्‍पर आहोत. रक्‍ताचा कर्करोग असलेल्‍या रुग्‍णांचे जीवन सुखकर करतांना त्‍यांना जगण्याची नवी उमेद निर्माण केल्‍याचा आनंद होतो आहे. आपल्‍या प्रत्‍यारोपणाच्‍या प्रवासाबद्दल डॉ.जुनागडे म्‍हणाले, की आजवर ७५ यशस्‍वी बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांट करण्यात यश आलेले आहे. सर्वात कमी १८ महिन्‍याच्‍या थॅलेसिमियाग्रस्‍त बालकाचे यशस्‍वी बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांट करण्यात आलेले आहे. तर सर्वात वयोवृद्ध रुग्‍ण ६७ वर्षांचा होता.
मायलोमा हा रक्‍ताचा कर्करोग असलेल्‍या या रुग्‍णाचे यशस्‍वी बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांट करण्यात आलेले आहे.
रुग्‍णालयात नाशिक शहर जिल्‍ह्‍यासह उत्तर महाराष्ट्रातून रुग्‍ण उपचारासाठी येत असतात. याशिवाय रुग्‍णालयाची किर्ती परदेशापर्यंत पसरली असल्‍याने परदेशातूनही रुग्‍ण उपचारासाठी दाखल झाले होते. इराक या देशातील २ रुग्‍णांवर बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांट करण्यात आलेली आहे. ऑक्‍टोबर २०२० मध्ये रुग्‍णालयात अनोखा विक्रम नोंदविला होता. डबल कॉर्ड स्‍टेम सेल ट्रान्‍सप्‍लांट यशस्‍वी करतांना अशा प्रकारचे देशात प्रथमच यशस्‍वी उपचार करण्यात आल्‍याचे डॉ.जुनागडे यांनी नमूद केले आहे.
उपचार पद्धतीविषयी माहिती देतांना डॉ.जुनागडे सांगतात, दोन प्रकारच्‍या पद्धतीतून मज्‍जारज्‍जू प्रत्‍यारोपण अर्थात बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांट केले जाते. अटोलॉगस अर्थात आपल्‍याच पेशींचा (स्‍टेमसेल) उपयोग करुन उपचार करणे. आणि दुसर्या पद्धतीत ॲलोजेनिक या माध्ये भाऊ, बहिण किंवा पालकांच्‍या पेशींचा (स्‍टेमसेल) उपयोग प्रत्‍यारोपण केले जाते.
प्रामुख्याने रक्‍ताचा कर्करोग असलेले रुग्‍ण, लॅम्‍फोमा, मयेलोमा, थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया असलेल्‍या रुग्‍णांना नवजीवन प्रदान करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लांट करण्यात येत असते.

—
जनजागृती महत्वाची..

बोन मॅरो ट्रान्सप्लांट याविषयी समाजात जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. विशेषतः थॅलेसिमिया व सिकलसेल ऍनिमिया या प्रकारच्या रुग्णांचे प्रमाण भारतात अधिक आहेत. या आजाराच्या बाल रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट च्या माध्यमातून नवजीवन मिळू शकते. याबाबत जनजागृतीसाठी सामाजिक संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे डॉक्टर जुनागडे यांनी सांगितले. विशेषतः रक्ताच्या नात्यात लग्न होणाऱ्या नवदांपत्यांनी किंवा संतती चे नियोजन करताना दाम्पत्यानी रक्ताची तपासणी करून घेताना थलेसीमिया आजाराचा संभाव्य धोका लक्षात येऊ शकतो. व पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते असे डॉक्टर जुनागडे यांनी नमूद केले.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News