परिषद यशस्वी केल्या बाबत मधुमेहतज्‍ज्ञांनी मानले नाशिक शाखेचे विशेष आभार

Feb 5, 2023

तीन दिवसीय मधुमेह तज्‍ज्ञांच्‍या परीषदेचा उत्‍साहात समारोप

नाशिक : जगासह भारतामध्ये मधुमेहाच्‍या रुग्‍णांचे वाढते प्रमाण व यासंदर्भात आवश्‍यक जागृकता, उपचार पद्धतीतील आधुनिकता या विषयांवर तीन दिवसीय परीषदेत मंथन करण्यात आले. महाराष्ट्र राज्‍य डायबेटिस असोसिएशन यांच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या तीन दिवसीय राज्‍यस्‍तरीय परीषदेचा रविवारी (५ फेब्रुवारी) उत्‍साहात समारोप झाला. राज्‍यभरातून आलेल्‍या सुमारे ९०० मधुमेह तज्‍ज्ञांनी परीषदेच्‍या यशस्‍वी आयोजनासाठी आयोजन समिती अध्यक्ष डॉ.नारायण देवगांवकर व त्‍यांच्‍या टीमचे अभिनंदन करत आभार मानले. या परीषदेप्रमाणेच यावर्षी होत असलेल्‍या राष्ट्रीय परीषदेमध्येही डॉक्‍टरांनी असात उत्‍स्‍फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ.देवगांवकर यांनी सहभागी डॉक्‍टरांना केले.

त्र्यंबकरोडवरील हॉटेल एमरार्ड पार्क, ग्रीन व्‍ह्‍यू येथे ही तीन दिवसीय परीषद पार पडली. या परीषदेच्‍या माध्यमातून मधुमेहाच्‍या उपचार पद्धतीसंदर्भात तज्‍ज्ञ मान्‍यवरांनी सत्रांच्‍या माध्यमातून मार्गदर्शन केले. परीषदेच्‍या यशस्‍वी आयोजनाबद्दल आयोजन समिती अध्यक्ष तथा आरएसएसडीआय महाराष्ट्रचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नारायण देवगांवकर म्‍हणाले, राज्‍यभरातून या परीषदेला मधुमेह तज्‍ज्ञांचा चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण टीमने केलेल्‍या अथ्थक परिश्रमांतून ही परीषद यशस्‍वी झालेली आहे. मधुमेह तज्‍ज्ञांची राष्ट्रीय स्‍तरावरील परीषद आयोजनाचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले आहे. माझ्या कार्यकाळात हे यजमानपद मिळाल्‍याने स्‍वतःला भाग्‍यवान समजतो. राज्‍यस्‍तरीय परीषदेप्रमाणेच राष्ट्रीय स्‍तरावरील परिषदेत मधुमेह तज्‍ज्ञांनी उत्‍स्‍फूर्तपणे सहभागी होतांना मान्‍यवरांच्‍या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. या परीषदेत आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील तज्‍ज्ञ येणार असल्‍याने प्रत्‍येक डॉक्‍टरने सहभागी व्‍हावे, अशी ही परीषद असेल.

परिषदेच्‍या अखेरच्‍या दिवशी ५ फेब्रुवारीला अहमदाबाद येथील डॉ. बन्सी साबू, मुंबईतील डॉ. अमीत गुप्ता, डॉ. एच.बी.चंडालिया या मान्‍यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच परिषदेनिमित्त भरविलेल्‍या प्रदर्शनाला सहभागी डॉक्‍टरांनी भेट देतांना माहिती जाणून घेतली. परिषद यशस्‍वीतेसाठी आयोजन समिती अध्यक्ष डॉ.नारायण देवगांवकर, सचिव डॉ.समीर चंद्रात्रे यांच्‍रूासह सायंटीफीक प्रोग्रॅम कमिटीचे डॉ. यशपाल गोगटे, डॉ. पार्थ देवगावकर, डॉ. समीर शहा, डॉ. राहुल पाटील, डॉ. विजय धोंडगे, डॉ. समीर पेखळे, डॉ.अरुण महाले, डॉ.दीपेंद्र चौधरी, डॉ.विनोद चौधरी, डॉ.दिनेश देसले, डॉ.प्रितम अहिरराव, डॉ.भुषण देवरे आदींनी परीश्रम घेतले

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News