तब्बल १७ तास शस्रक्रिया, रुग्णाला वाचवण्यात डॉक्टरांच्या टीम ला यश ..!!

Feb 23, 2023

अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांची यशस्वी कामगिरी

नाशिक – 35 वर्षीय महिला ओटी पोटात दुखणे , लघवी करताना त्रास होणे आणि जुलाब होत असल्याने नाशिक च्या अपोलो हॉस्पिटल मध्ये आल्या , अपोलो हॉस्पिटल्स नाशिक चे युरोलॉजिस्ट डॉ. प्रवीण गोवर्धन यांनी रुग्णाला तपासले आणि काही तपासण्या केल्या , त्यावेळी रुग्णाच्या पोटात अनेक गाठी आहेत , या गाठी गर्भपिशवी ,जठर , मोठे आतडे यांना चिकटलेल्या आहेत तसेच या गाठी कॅन्सर च्या आहेत असे लक्षात आले या आजाराला “पेरिटोनियल कार्सिनोमेटोसिस ” असे म्हणतात, तसेच रुग्णाच्या शरीरात रक्ताचे व अल्बुमिन घटक कमी होत होते आणि रुग्णाला cytoreductive Surgery करण्याची गरज होती. हि अत्यंत अवघड आणि क्लिष्ठ शस्त्रक्रिया तब्बल १७ तास चालली आणि रुग्णाला बाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
यावेळी माहिती देताना डॉ.प्रवीण गोवर्धने म्हणाले कि ” हि एक अत्यंत अवघड आणि क्लिष्ठ शस्त्रक्रिया असते, यासाठी सर्जन्स ची टीम आवश्यक असते , प्रत्येक शस्रक्रिया करण्याआधी रुग्णाची फिटनेस टेस्ट केली जाते ,यावेळी रुग्णाची शस्रक्रिया सुरू असताना रक्त रिझर्व्ह करण्यात आले शस्रक्रिया करताना सुरुवातीला पोटात दुर्बीण च्या साह्याने कॅन्सरची गाठ कुठे कुठे आहे हे निरीक्षण करण्यात आले, या वेळी संपूर्ण peritoneun काढण्यात आले, उदर पटलाला चिकटलेल्या गाठी , यकृताचा थर व यकृताच्या डाव्या भागातील गाठ, प्लीहा, जठर मोठ्या आतड्याच्या गाठी काढण्यात आल्या. गर्भाशय, लहान आतड्याचा भाग, मोठ्या आतड्याचा थोडा भाग एकत्रित काढण्यात आला. पित्ताशय सलउचीदवके , मैसेंट्री च्या गाठी, औमेंटम हे काढण्यात आले.”
डॉ. अजय जाधव यांनी सांगितले की “या ऑपरेशन दरम्यान आतड्यांचे दोन ठिकाणी जोड़ देण्यात आले. ऑपरेशन दरम्यान पेशंटला चार रक्ताच्या पिशव्या द्याव्या लागल्या. ऑपरेशन नंतर रुग्णाला फुफ्फुसाचा त्रास होत होता तेंव्हा आयसीयू मध्ये डॉ.प्रवीण ताजणे आणि त्यांच्या टीमने पेशंटची खूप काळजी घेतली , 25 दिवसांनी रुग्णाला घरी सोडण्यात आले. या संपूर्ण ऑपरेशनला तब्बल 17 तास लागले हे ऑपरेशनच्या शेवटी शरीरातील सर्व गाठी काढण्यात डॉक्टरांना यश आले. कॅन्सरच्या गाठीचे निदान लवकर झाल्यास कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो ”.

यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटल नाशिकचे युनिट हेड श्री. अजित झा म्हणाले अपोलो हॉस्पिटल्स नाशिक मध्ये अत्याधुनिक सुविधा, अनुभवी डॉक्टरांची टीम,प्रशिक्षित नर्सिग स्टाफ, फिसिओथेरपी टीप, आहार तज्ञ हे सगळं एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने अशा क्लिष्ट शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. डॉ. प्रवीण गोवर्धने, कॅन्सर सर्जन डॉ. अजय जाधव, डॉ. अमरीश चॅटर्जी , भूल तज्ञ डॉ. भूपेश
पराते व डॉ. चेतन भंडारे यांनी खूप संयमाने आणि कौशल्याने अतिशय अवघड आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी केली याचे विशेष कौतुक आहे, उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना इतर मोठया शहरात जाण्याचीगरज नाही, अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये आपण अशा ब-याच क्लिष्ट अशा अवघड शस्त्रक्रिया करत आहोत.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News