IMA च्या कन्सल्टंट प्रीमियर लीग ३ मार्च पासून सुरु

Mar 2, 2023

आयपीएलच्या धर्तीवर होणार स्पर्धा

नाशिकः इंडीयन मेडीकल असोसिएशन चे सदस्य असलेले कन्सल्टंट आणि सुपर कन्सल्टंट हयांची भव्य अशी कन्सल्टंट प्रीमियर लीग (सी पि एल २०२३) स्पर्धा प्रथमच ३ ते ५ मार्च रोजी महात्मा नगर ग्राउंड वर आयोजित होणार असल्याची माहिती सीपिएल २०२३चे समिती प्रमुख डॉ. अनिरुद्ध भांडारकर, आयोजन समितीचे चेअरमन डॉ. नितीन चिताळकर व सेक्रेटरी डॉ. मिलिंद गांगुर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मेंदू आणि हृदयावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आपल्या हातात चक्क बॅट घेऊन मैदानावर आयपीएलच्या धर्तीवर सी पि एल हि क्रिकेट स्पर्धा खेळणार आहेत. या स्पध्येमध्ये ६ संघ विजेतेपदासाठी भिडणार आहेत, जवळपास १०० च्या वर कन्सल्टंट डॉक्टर या स्पर्धेत सहभागी हेत आहेत, संकल्प हॉस्पिटलचे प्रसिद्ध कर्कविकार तज्ज्ञ डॉ. भूषण नेमाडे यांचा संकल्प सुपरनोवा, नाशिक पेन केअर चे डॉ. विशाल गुंजाळ यांचा नाशिक पेन किलर, सिन्नर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. आनंद नागरे यांचा सहयाद्री शेरा, पिंपळगावचे प्रसिद्ध हृदय रोग तज्ज्ञ डॉ. मयूर पंजाबी ह्यांचा ओम वॉरियर तसेच अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलचे प्रसिद्ध सांधेरोपन शसक्रिया तज्ज्ञ डॉ प्रणित सोनवणे यांचे ऑर्थो रोबोडॉक्स आणि मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. विशाल सावळे यांचा न्युरोप्लस वीर मराठा असे ६ संघ दि. ३,४ आणि ५ मार्च रोजी मैदानात उतरतील. खेळाडूंची लिलाव प्रक्रिया दि. १२ फेब्रुवारीला पार पडली, या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यूट्यूब च्या माध्यमातून केले जाणार आहे.

स्पर्धेचे उदघाटन दि. ३ मार्च रोजी रोजी सकाळी १० वाजता नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मा. विनोद शहा यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी नितीन धात्रक, डॉ. अजित तिदमे, डॉ. निलेश निकम, डॉ तुषार देवरे, डॉ. निखिल काजळे, डॉ. अभिषेक बागुल, डॉ. प्रितीश जुनागडे, डॉ. समीर काळे, डॉ. परिमल सोनवणे, साफल्य हॉस्पिटल, डेल्टा हेल्थ केअर, ट्रू लॅब , जगदंब हॉस्पिटल, एनरझल , सनशिव फार्मा यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. कपिल पाळेकर, डॉ. भूषण नेमाडे, डॉ. सचिन आहेर, डॉ. दिनेश ठाकूर, डॉ. अमोल राजदेव, डॉ. वैभव पवार, डॉ. मुकेश डॉ जितेंद्र पाटील, डॉ. परिमल सोनवणे, विशेष परिश्रम घेत आहेत.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News