nashik : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल च्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. याप्रसंगी केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर म्हणाले, महिलांमुळेच खऱ्याअर्थाने जगाने सर्वच क्षेत्रात क्रांती केली आहे. कुटुंबापासून ते समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यन्त महिलांचे योगदान अतुलनीय आहे. महिला समाजाच्या आधारस्तंभ असून आपल्या जबाबदाऱ्या सांभाळताना आपल्या आरोग्यालाही जपा असा मौलिक संदेश डॉ उज्जमा यांनी या वेळी मार्गदर्शन करतांना दिला.
कर्तृत्वान महिला सन्मान सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या डॉक्टर परिचारिका व कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. नृत्य कला मध्ये होली ग्रुप विशेष दाद देऊन गेला, प्रश्न मंजुषा खेळात उपस्थित महिलांनी उत्तस्पफूर्त सहभाग नोंदवला व बक्षिसांची लयलूट केली. या प्रसंगी मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , सेंटर हेड समीर तुळजापूरकर , रिजनल एच आर हेड अर्णब कुमार , डॉ उज्जमा , डॉ भाग्यश्री , नर्सिंग हेड राजेश आदी उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मानवसंसाधन विभागाचे नीरज नायर , निकी शर्मा , मधुकर कदम , आदींनी परिश्रम घेतले
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





