वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वतीने ‘आय अ‍ॅम फिअरलेस’ संकल्पनेतंर्गत महिला दिन साजरा

Mar 9, 2023

नाशिक: नाशिक येथील वोक्हार्ट रुग्णालयाने ‘आय अ‍ॅम फियरलेस’ उपक्रमाद्वारे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित आरोग्य विषयक चर्चा सत्राव्दारे स्त्रीरोगांविषयी माहिती तज्ज्ञ डाँक्टरांनी दिली. यावेळी डाँक्टर, परिचारिका आणि कर्मचारी वर्गाने रँम्प वाँक, गायन, नृत्याविष्कार सादर करत महिला दिन अनोख्या आणि अविस्मरणीय पध्दतीने साजरा केला. यावेळी कार्यक्रमात डाँ.श्रध्दा सबनीस, डाँ.सुदर्शना पाटील, डाँ.शर्वरी माळी, डाँ.किरण अगरवाल, डाँ.पल्लवी पाटील आणि वोक्हार्ट रूग्णालयाच्या केंद्रप्रमुख डाँ.रेश्मा बोराले यांच्यासह परिचारिका सहभागी झाल्या होत्या.

या कार्यशाळेत उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांच्या प्रजनन अवयवांसंबंधीत समस्यांवर देखील संवाद साधला तसेच स्वःपरिक्षण करुन स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्याचा सल्ला तसेच प्रशिक्षण याठिकाणी देण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यावर आजाराचे निदान झाल्यास भविष्यातील धोका कसा टाळता येतो याविषयी देखील जनजागृती करण्यात आली. या कार्यशाळेतंर्गत प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले तसेच महिला कुटुंबियांची सतत काळजी घेतात परंतू स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतात म्हणून कोणताही आजार अंगावर न काढता वेळीच उपचार घेण्याचा सल्ला डॅाक्टरांनी दिला.

वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय संचालिका सु.जहाबिया खोराकीवाला सांगतात की, महिलांमध्ये असलेली मेहनती वृती तसेच आणि जबाबदारीचे पेलण्याची ताकद वाखणण्याजोगी आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन महिला दिन साजरा करणे, त्यांना प्रेरणा देणे आणि एकमेकांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. या महिला दिनानिमित्त त्यांच्या आरोग्यासाठी विविध कार्यशाळा यशस्वीरित्या राबविण्यात आल्या.

डॅा.रेश्मा बोराळे म्हणाल्या की, महिल्या या कुटूंबाचा आधारस्तंभ आहेत. घर ते कार्यालय या दोन्ही ठिकाणी यशस्वीपणे आपली जबाबदारी पार पाडत असून इतरांचे करताना स्वताकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होताना दिसून येते. म्हणून, आता आधी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता आरोग्यविषयक प्रत्येक समस्येबाबत खुलेपणाने चर्चा केली पाहिजे. महिलांशी संबंधित आजाराबाबत आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडून जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, ८ ते ३१ मार्च दरम्यान तज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्लामसलत केले जाणार आहे. त्याचप्रमाण रेडीओलाँजी आणि पँथोलाँजीवर सर्व रूग्णांना २० टक्के सूट दिल्याचे डाँ.रेश्मा यांनी स्पष्ट केले. तसेच, रुग्णसेवा पुरविणाऱ्या रूग्णांलयातील महिला कर्मचा-यांचे मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी योग शिबीराचे आयोजनही करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News