जागतिक महिलादिनानिमित्त वॉव ग्रुपतर्फे दुचाकी रॅली आयोजन

Mar 9, 2023

नाशिक – शासनामार्फत बेटी बचाओ, बेटी पढाओ, ‘माझी कन्या भाग्यश्री’, महिला व बालविकास विभाग तसेच सामाजिक न्याय विभागाकडून समाजातील सर्व स्तरात काम करणाऱ्या महिला आणि युवतींसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. महिलांना शिक्षित, सक्षम आणि स्वयंपूर्ण बनविण्याचा या योजनांचा उद्देश आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बुधवारी (ता.८) रोजी वुमन ऑफ विस्डम अर्थात वॉव ग्रुुपच्या महिला दुचाकी रॅलीच्या सातव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे, मयूर अलंकारचे संचालक मयूर शहाणे, युनिव्हर्सल अॅकॅडमीच्या वैशाली टिळे, किरण पाटील आदी प्रमुख पाहुणे होते. तसेच संगीता गायकवाड, नलिनी कड,डॉ रैना शेख, राहिला शेख, नलिनी बागूल, कामिनी तनपुरे, सुमुखी अथानी , ललिता देवरे , ललिता पाटोळे,यांची उपस्थिती होती.

डॉ. कल्पना कुटे म्हणाल्या, की वॉव ग्रुपकडून राबविण्यात येणारा सॅनेटरी नॅपकिनविषयीचा ‘रेड डॉट बॅग’ हा प्रकल्प कौतुकास्पद आहे. महिलांसाठी काम करणाऱ्या इतर सामाजिक संस्थांसाठी हा प्रकल्प प्रेरणादायी आहे. दुचाकी रॅलीच्या माध्यमातून वॉव ग्रुपकडून गरजू दिव्यांग महिलांना आत्मनिर्भरतेसाठी व्यवसायास आर्थिक मदत करण्यात आली. तसेच प्रबोधिनीच्या शाळेच्या विद्यार्थिनीला मदत करण्यात आली.

ठक्कर डोम येथे सकाळी सात वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दुचाकी रॅलीचा शुभारंभ झाला. ठक्कर डोम, एबीबी सर्कल, महात्मा नगर, जुना गंगापूर नाका, कॉलेज रॉड मार्गे, ठक्कर डोम असा रॅलीचा मार्ग होता. शहरातील २५०० हून अधिक महिला या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. या रॅलीतील शंभर टक्के महिलांनी हेल्मेट परिधान केले होते. हॉर्न न वाजविण्याच्या नियमाचे पालन करणारी ही आदर्श रॅली ठरली. भरजरी पैठणी, नऊवारी, सलवार-कुर्ता अशी आकर्षक पारंपरिक वेषभूषा ते टी-शर्ट, जॅकेट आणि जीन्स असा पेहराव करून सामाजिक संदेश देत महिला या रॅलीत उत्साहात सहभागी झाल्या होत्या. वॉव ग्रुपच्या दोनशेहून अधिक सदस्यांनी कम्युनिटी हेल्थ फाऊंडेशन च्या स्वयंसेवकांनी या रॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
तसेच या रॅलीत पुरुषांनी देखील सहभागी होऊन महिलांची साथ दिली

या वेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे ः
सर्वोत्कृष्ट पोषाख ः रेणुका भामरे, नलिनी कड, पद्मश्री चुंबळे, रोशनी लचके
सर्वोत्कृष्ट सामाजिक संदेश ः शिल्पा चव्हाण, फेब्युलस ग्रुप, स्पार्कलिंग ग्रुप
सर्वोत्कृष्ट थिम ः चंद्रा हावरे, सुचिता पवार, धनश्री गोराणे, पल्लवी आणि ग्रुप
सर्वोत्कृष्ट दुचाकी सजावट ः धनश्री गोराणे, आशा प्रसाद
सर्वोत्कृष्ट महिला दुचाकीस्वार ः गौरी भामरे, प्रणिता घोडके, पियुषा घिडके, अर्पिता ठाकूर
सर्वोत्कृष्ट आई आणि मुलगा ः शालिनी पाटील, शिवांश पाटील
सर्वोत्कृष्ट सासू आणि सून ः मीना आहुजा, सिमरन आहुजा
सर्वोत्कृष्ट सारखे पोषाख ः पूजा, श्रद्धा, अंजू, रश्मी चुंबळे
स्पर्धेच्या ठिकाणी सर्वप्रथम येणाऱ्या महिला ः तरन्नुम, ईरम, ईस्मत
सिनियर सिटीझन प्रमिला पाटील , आशा स्वार

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News