स्‍त्री शक्‍तीला कर्करोगाच्‍या विळख्यातून मुक्‍त करावे डॉ.राज नगरकर

Mar 15, 2023

निमा न्‍यू नाशिकच्‍या सहकार्याने महिलांचा सत्‍कार

Nashik : कुटुंबात आई, बहिण, वहिणी, पत्‍नी अशा विविध रुपांनी महिला ही अत्‍यंत महत्‍वाची भूमिका बजावत असते. महिलांमध्ये स्‍तनाचे, गर्भाशयाच्‍या मुखाच्‍या कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण वाढले असून, सजग राहून स्‍त्रीशक्‍तीला कर्करोगाच्‍या विळख्यातून मुक्‍त करण्याचे आवाहन एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचे प्रमुख व चीफ ऑफ ऑन्‍कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक्‍स सर्व्हीसेस प्रा.डॉ.राज नगरकर यांनी केले. ‘आरोग्‍य सहेली’ या रुग्‍णालयाच्‍या उपक्रमाची माहिती देतांना, जास्‍तीत जास्‍त चाचण्या करण्यासह लसीकरणावर भर देण्याची आवश्‍यकता त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
मुंबई-आग्रा महामार्गावरील एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर येथे जागतिक महिला दिनानिमित्त निमा न्‍यू नाशिक या संस्‍थेतर्फे व एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरच्‍या सहकार्याने सत्‍कार समारंभ पार पडला. यावेळी स्‍त्रीशक्‍तीचा सन्‍मान ‘निमा गौरव पुरस्‍कार’ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमास एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरच्‍या सीईओ प्रार्थना नगरकर, मेडिकल ऑन्‍कॉलॉजीस्‍ट डॉ.श्रृती काटे, निमा न्‍यू नाशिक संस्‍थेचे अध्यक्ष डॉ.दीपक चौधरी, सचिव डॉ.प्रशांत वाणी, कोषाध्यक्ष डॉ.परिक्षित खाचणे आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

डॉ.श्रृती काटे म्‍हणाल्या, कर्करोगाचे निदान झाल्‍यानंतर दर्जेदार उपचारासोबत कुटुंबाची साथ मिळणे आवश्‍यक असते. विशेषतः महिला रुग्‍णांना त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍यांनी समजून घेतांना, कर्करोगाविरोधातील लढ्यात भावनिक पाठबळ दिले पाहिजे.
प्रास्‍ताविकात निमा न्‍यू नाशिकचे अध्यक्ष डॉ. दीपक चौधरी यांनी संस्‍थेच्‍या कार्याची माहिती देतांना, पुरस्‍कार समारंभ आयोजनामागील भूमिका विशद केली. या कार्यक्रमास महिलांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News