जागतिक श्रवण दिनानिमित्त नमस्ते नाशिक फौंडेशनतर्फे मदतीचा हात

Mar 16, 2023

कायम असे उपक्रम कायम राबवले जातील – स्नेहल देव, अध्यक्ष, नमस्ते नाशिक फौंडेशन

नाशिक  : जेथे कमी तेथे आम्ही या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फौंडेशनतर्फे नुकताच मखमलाबाद गावातील सह्याद्री शिक्षण प्रसारक समाज विकास मंडळ नाशिक संचलित जागृती श्रवण विकास विद्यालयास श्रवण दिनानिमित्त मदतीचा हात देण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नमस्ते नाशिक फौंडेशनच्या अध्यक्ष सौ स्नेहल देव, ऍडव्होकेट उज्ज्वला पाटील, सुवर्ना सायंकर , शामकांत भोंगे , रिदम देव,संदीप देव शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र वाघमोडे आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने शाळेला कडधान्य तसेच किराणा साहित्य देण्यात आले.
यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र वाघमोडे यांनी माहिती दिली की, १९९८ पासून मखमलाबाद येथे शाळा कार्यरत असून सध्या शाळेत ८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नमस्ते नाशिक फौंडेशन संस्थेला जेव्हा जेव्हा मदतीसाठी आवाज दिला जातो तेव्हा तात्काळ आम्हाला मदत उपलब्ध होते असे सांगून या माहितीचा आम्ही चांगला सद्साउपयोग करून घेऊ असे सांगून नमस्ते नाशिक फौंडेशनचे पदाधिकारी यांचे आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News