लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडियाचा १२५ वा स्थापना दिवस साजरा

Mar 17, 2023

नाशिक – कुष्ठरोगाने बाधित व्यक्तींच्या आरोग्य आणि सन्मानासाठी काम करणारी देशातील सर्वात जुनी समाजसेवी संस्था लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया च्या नाशिकमधील व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचा १२५ वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला .
लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया ची स्थापना 1874 मध्ये करण्यात आली . आजमितीला देशभरात संस्थेतर्फे 14 रुग्णालये, सहा व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे, पाच स्नेहालय (कुष्ठरोगाने बाधित व्यक्तींसाठी घर, ज्यांना स्वतःचे म्हणवायला घर नाही) चालविण्यात येतात.
नाशिक येथील या युनिटची स्थापना 1898 मध्ये कुष्ठरोगाने बाधित व्यक्तींसाठी घर म्हणून करण्यात आली होती. ज्याचे रूपांतर 1980 मध्ये व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात रूपांतरित झाली .येथे दरवर्षी 120 तरुण प्रौढांना मोफत निवासी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट प्रदान करण्यात येते . याना मेकॅनिक डिझेल अभ्यासक्रम , मेकॅनिक मोटार वाहन, वेल्डर, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, टेलरिंग, ब्युटीशियन, इलेक्ट्रीशियन, प्रिंटिंग असे स्किल्स शिकविले जातात.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेला प्लेसमेंट, प्रवेश, कौशल्य प्रशिक्षण आणि निधी उभारणीत मदत करणाऱ्या सर्व भागीदारांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना संस्थेच्या प्राचार्या शैला फ्रान्सिस म्हणाल्या की, आमचे भागीदार आणि व्हीटीसीचे अंगभूत भाग आहेत ज्यांच्या मदतीशिवाय व्हीटीसीचे सर्व उपक्रम राबविणे शक्य होणार नाही.
कुष्ठरोगाने बाधित असलेल्या दूरच्या आणि दुर्गम खेड्यातील लहान मुलांचा शोध घेणे, कुष्ठरोगाने बाधित व्यक्तींवर अवलंबून असलेल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून दुर्लक्षित असलेल्या इतर अपंग व्यक्तींचा शोध घेणे हे केंद्राचे आव्हान आहे. त्यांना नाशिक मधील प्रशिक्षण केंद्रात आणले जाते, त्यांचे पालनपोषण केले जाते, प्रशिक्षित केले जाते, शिकवले जाते आणि योग्य मनुष्य बनवले जाते. त्यांच्या जीवनात शिक्षणाला स्थान नसलेल्या पार्श्वभूमीतून येणे हे एक आव्हान आहे.
विद्यार्थ्यांसाठी केआयए मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, आयशर, अशोक लेलँड, रोहन बिल्डर्स यांसारख्या कंपन्यांद्वारे प्लेसमेंट उपलब्ध करून दिली जाते. या प्रसंगी डॉ. मीरा भोये आरोग्य सेवा (कुष्ठरोग) शाखा नाशिकच्या सहायक संचालक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तसेच सेवानिवृत्त अधीक्षक मासोजी हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News